स्पर्धा अन्‌ सांस्कृतिक कार्यक्रमातून झेडपी कर्मचारी तणावमुक्त! सीईओंच्या पुढाकारातून कार्यक्रम यशस्वी; कमी मनुष्यबळात काम करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य

कमी मनुष्यबळात अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाचे कामकाज गतिमान करण्याचा प्रयत्न सर्व कर्मचारी करीत आहेत. तीन-चार वर्षांपासूनच अशीच स्थिती असून त्या कर्मचाऱ्यांचा ताण कमी व्हावा, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमधून तणावमुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न सीईओ मनीषा आव्हाळे यांनी केला.
solapur zp ceo manisha awhale
solapur zp ceo manisha awhale sakal

सोलापूर : कमी मनुष्यबळात अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाचे कामकाज गतिमान करण्याचा प्रयत्न सर्व कर्मचारी करीत आहेत. तीन-चार वर्षांपासूनच अशीच स्थिती असून त्या कर्मचाऱ्यांचा ताण कमी व्हावा, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमधून तणावमुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न सीईओ मनीषा आव्हाळे यांनी केला. यावेळी सर्वच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

सोलापूर जिल्हा परिषदेवरील प्रशासक नियुक्तीला मार्च २०२४ रोजी दोन वर्षे पूर्ण होतील. प्रशासकराजमध्ये कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला असून लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा त्यांच्यावरील जबाबदारी वाढणार आहे. जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत, कृषी, शिक्षण, समाजकल्याण, आरोग्य, बांधकाम अशा विभागांमध्ये अंदाजे ३५ टक्के मनुष्यबळ कमी आहे. पदे रिक्त होऊनही अद्याप भरती झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी मनुष्यबळात अधिक काम करावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

सीईओंनी कर्मचाऱ्यांना कामकाजात सुधारणा व्हावी म्हणून प्रशिक्षण देखील दिले. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या परीक्षेला प्राधान्य न देता त्यांनी कर्मचाऱ्यांच्या तणावमुक्तीला या निमित्ताने प्राधान्य दिल्याने सर्वांनी सीईओ आव्हाळे यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष नियोजन सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी अचूक पद्धतीने केल्याचेही यावेळी पाहायला मिळाले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सरचिटणीस विवेक लिंगराज यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे आभार मानले आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अधिकाऱ्यांसमवेत कर्मचाऱ्यांचा जल्लोष

हुतात्मा स्मृती मंदिर येथील सांस्कृतिक कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, महिला व बालकल्याणचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, अमोल जाधव, बांधकाम विभागाचे अभियंता नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी, सुनील कटकधोंड, समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, अविनाश गोडसे, विवेक लिंगराज यांच्यासह ६२४ जणांनी डान्स असो वा इतर कलाप्रकारातून सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांचा नव्हे तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होतोय, असा जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांचाही लक्षणीय सहभाग होता.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची स्थिती

  • मजूर पदे अंदाजे

  • ४,२००

  • कार्यरत कर्मचारी

  • ३,६००

  • क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी

  • २,९७६

  • सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी

  • ६२४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com