६७६२ मुलींनी दहावीतूनच सोडले शिक्षण! अनेकांचा बालविवाह झाल्याचा संशय

दहावीत प्रवेश घेऊनही तब्बल सहा हजार ७६२ मुलींनी परीक्षाच दिली नाही. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ६९५ मुलींचा समावेश असून त्या मुलींनी अर्ध्यातूनच शिक्षण का सोडले, त्यांचा बालविवाह झाला का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Sakal-Exclusive
Sakal-Exclusivesakal

सोलापूर : मुलींचा जन्मदर व शिक्षणातील टक्का वाढावा म्हणून ‘मुली वाचवा, मुली शिकवा’साठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. पण, १४ ते १७ वयोगटातील मुली मधूनच शिक्षण सोडून देतात. दहावीत प्रवेश घेऊनही तब्बल सहा हजार ७६२ मुलींनी परीक्षाच दिली नाही. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ६९५ मुलींचा समावेश असून त्या मुलींनी अर्ध्यातूनच शिक्षण का सोडले, त्यांचा बालविवाह झाला का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Sakal-Exclusive
शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! वेळेच्या अर्धा तास अगोदर शाळेत न येणारे शिक्षक बिनपगारी

कोरोनामुळे राज्यातील शाळा दोन वर्षे बंद राहिल्या आणि बालविवाहाचे प्रमाण वाढले. या संकटात शाळा पुन्हा कधी सुरु होतील, हे निश्चितपणे सांगता येत नव्हते. दुसरीकडे कौटुंबिक परिस्थिती बिकट असलेल्यांनी कोरोनाच्या निर्बंधात स्वस्तात विवाह उरकले. चाईल्ड लाईनवरून मिळालेल्या माहितीच्या आधारावर बालकल्याण समित्यांनी राज्यभरात दोन हजारांहून अधिक बालविवाह रोखले. तर काहींनी गुपचूप विवाह उरकले. शाळेला प्रवेश घेऊनही परीक्षेला अर्ज न केलेल्या आणि परीक्षेचा अर्ज करूनही परीक्षेला न बसणाऱ्या मुली गेल्या कुठे, याचा अभ्यास करणे अपेक्षित होते. पण, १७ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला आणि राज्यातील तब्बल सहा हजार ७६२ मुलींनी अर्ध्यातूनच शाळा सोडल्याचे वास्तव समोर आले. त्यांनी परीक्षेसाठी अर्ज केलेच नाहीत, तर काहींनी परीक्षेचा अर्ज करूनही परीक्षा दिली नाही. काहींनी कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे परीक्षा दिली नाही. पण, बहुतेक मुलींनी परीक्षा न देण्याची किंवा परीक्षेचा अर्ज न करण्याची कारणे वेगळीच असून त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. दरम्यान, मुलींच्या शिक्षणावर मोठा खर्च करूनही किंवा उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही, अशी मानसिकता अजूनही पालकांमध्ये विशेषत: ग्रामीण भागात आहे. त्यामुळेच बालविवाह आणि शाळांमधील गळती वाढल्याचे बोलले जात आहे.

Sakal-Exclusive
सोलापूर पोलिसांची ‘सीएमआयएस’ प्रणाली! एका क्लिकवर समजणार गुन्हेगारांची कुंडली

शाळांकडून माहिती मागविली जाईल

इयत्ता दहावीत प्रवेश घेऊनही परीक्षेचा अर्ज न भरलेल्या व परीक्षेचा अर्ज भरूनही परीक्षा न दिलेल्या मुलींच्या अडचणी संबंधित शाळांकडून पत्राद्वारे मागवून घेतल्या जातील. त्या मुलींनी नेमक्या कोणत्या कारणामुळे शिक्षण सोडले किंवा परीक्षा का दिली नाही, हे स्पष्ट होईल.

- भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

Sakal-Exclusive
मी पुन्हा येईन! राज्यसभा, विधान परिषदेनंतर आता सत्तापरिवर्तनाचा प्लॅन?

२७२ मुलींनी परीक्षा अर्जच केले नाहीत

सोलापूर जिल्ह्यातील एक हजार ८७ माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता दहावीसाठी २८ हजार ७८९ मुली शिकत होत्या. त्यापैकी २७२ मुलींनी परीक्षेसाठी अर्जच केला नाही. दुसरीकडे २८ हजार ५१७ मुलींनी बोर्डाच्या परीक्षेचा अर्ज केला, पण त्यातील ४२३ मुलींनी परीक्षाच दिली नाही. मोहोळ, करमाळा, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यात परीक्षा न देणाऱ्या (अर्ध्यावर शिक्षण सोडणारे) मुलींची संख्या अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com