बागी ३ : अॅक्शनला लिखाणाचं गालबोट

Baaghi-3-Movie
Baaghi-3-Movie

‘मेरे भाई को हाथ लगाया तो मैं ठोक देता हूं,’ असं म्हणत एक गुंड आपला भाऊ जिथं संकटात आहे, तिथं पोचतो आणि धुलाई करीत फिरतो. मग तो भाऊ आग्र्यातल्या गल्लीत अडको, नाहीतर सीरियामधील जगातील सर्वांत खतरनाक अतिरेक्याच्या अड्ड्यात! ‘बागी’ या मालिकेतील हा अहमद खानदिग्दर्शित ‘बागी ३’ हा चित्रपट डोकं बाजूला ठेवून पाहिल्यास किमान मनोरंजन करतो. टायगर श्रॉफचे स्टंट आणि रितेश देशमुखचा बरा अभिनय अडीच तास प्रेक्षागृहात बसण्याचं बळ देतो.

‘बागी ३’ची कथा आग्र्यात सुरू होते. एका इन्स्पेक्टरची (जॅकी श्रॉफ) दोन मुलं विक्रम (रितेश देशमुख) आणि रॉनी (टायगर श्रॉफ) विरुद्ध स्वभावाचे आहेत. प्रत्येक गोष्टीत रडणारा, आत्मविश्‍वास नसलेला विक्रम प्रत्येक गोष्टीत रॉनीवर अवलंबून आहे. वडील मरताना रॉनीकडून विक्रमला सांभाळण्याचं आश्‍वासन घेतात आणि मग तो विक्रमच्या मागं सावलीसारखा उभा राहतो. रॉनीची सियाशी (श्रद्धा कपूर) मैत्री होते आणि तिची बहीण विक्रमची पत्नी होते. रॉनी विक्रमला सुपरकॉप बनवतो. सीरियामधील अतिरेकी संघटनेच्या म्होरक्या अबू जलाल याच्यासाठी भारतात काम करणाऱ्या हस्तकाशी (जयदीप अहलावत) विक्रमचा सामना होतो आणि तो संकटात सापडतो. तो सीरियात एका कारवाईसाठी जातो आणि त्याचं अपहरण होतं. रॉनीला हे समजताच तोही सीरियात दाखल होतो. आता रॉनी एके ४७ म्हणू नका, चॉपर म्हणू नका, रणगाडे म्हणू नका; सगळ्यांना पुरून उरतो आणि भावापर्यंत पोचतोच...कसा ते मोठ्या पडद्यावर (हिंमत असल्यास) पाहा...

टायगर श्रॉफ आणि त्याच्या हाणामाऱ्यांवर दिग्दर्शकानं मेहनत घेतली आहे. भावुक प्रसंगात तो उघडा पडत असला, तरी ॲक्शन सिक्वेन्समधील त्याची एनर्जी वाखाणण्याजोगी आहे. रितेश देशमुखला अभिनयाची चांगली संधी आहेे. श्रद्धा कपूरचं पात्र फारच ‘विनोदी’ आहे. इतर कलाकारांना फारशी संधी नाही. संगीत आणि गाण्यांच्या आघाडीवरही चित्रपट निराशा करतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com