आसाममध्ये अडकलेल्या कामगारांना सोनू सूदची मदत, म्हाणाला “आता कुटूंबियांनी भेटण्याची वेळ आली”

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

आसाममधून ट्विटरच्या माध्यमातून अभिनेत्यास मदत मागीतली होती.

कोरोना व्हायरस माहामारीने जगभरात थैमान घातले असताना भारतात लॉकडाऊनमुळे शेकडो लोक घरापासून दूर अडकले आहेत. त्यांनी घरी पोहचवण्याचे काम बॉलिवुड अभिनेता सोनू सूद सातत्याने करत आहे. सोशल मिडीया वेबसाईट ट्विटरच्या माध्यमातून लोक मदतीची मागणी करत आहेत. फक्त मुंबईच नाही तर देशभरात जागोजागी अडकलेल्या प्रवासी कामगारांनी घरी पोहचवण्याचे काम सोनू करत आहेत. आसाममध्ये अडकलेल्या काही कामगारांनी ट्विटरच्या माध्यमातून अभिनेत्यास मदत मागीतली होती. सोनूने देखील कुटूंबीयांना भेटण्याची वेळ आली आहे म्हणत मदतीचे आश्वसन दिले. 

रसिक प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येत आहे श्रीयुत गंगाधर टिपरे वाचा कधी येणार तर..

‘सोनू सर आम्ही आसामच्या गरिबाल्दी येथे आहोत, कृपया आम्हाला घरी पोहचवा” असे ट्विट करत अभिनेत्याकडे मदतीची मागणी केली होती. त्यासोबतच त्या व्यक्तीने एक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर मास्क लावून बसलेले दिसत आहेत. सोनूने या ट्विला रिप्लाय देत त्या सर्वांना ‘त्याच जागी थांबा, तुमची काळजी घेण्यासाठी माणसे पाठवत आहे, ते तुमच्या राहण्या-खाण्याची काळजी घेतील.’ असे सांगीतले. 

 

 

सोनू सूदने त्यापुढे लिहीले की, “आता तुमच्या कुटूंबीयांना भेटण्याची वेळ आली आहे. धन्यवाद.” सोनू सूदचे हे ट्विट सोशल मिडीयावक तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी त्याच्या या ट्विटवर चांगल्या प्रतिक्रीया देत आहेत. काही दिवसांपुर्वी सोनू सूदने विमानाच्या मदतीने 173 प्रवासी कामगारांना त्यांच्या घरी पोहचवले होते. कामगारांच्या मदतीसीठी त्याने बससेवा तसेच रेल्वे आणि विमानसेवा देखील उपलब्ध करुन दिली आहे. सोनू सूदच्या या चांगल्या कामीची सर्व स्तरांमधून स्तुती केली जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  People stuck in assam ask sonu sood for help tweet viral on internet