
2001 साली झी मराठी वाहिनीवर श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका आली होती आणि तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आजही कित्येकांच्या मनात ही मालिका कायम आहे.
मुंबई ः 2001 साली झी मराठी वाहिनीवर श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका आली होती आणि तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
आजही कित्येकांच्या मनात ही मालिका कायम आहे. एक आदर्श एकत्र कुटुंब नेमकं कसं असावं हे या मालिकेतून उत्तमरित्या मांडण्यात आलं. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. आता हीच मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर येत्या 15 जूनपासून सायंकाळी साडेसात वाजता ही मालिका प्रसारित होईल.
वाचा ः कोरोना रुग्णांना एमजीएम रुग्णालयाचा आधार; जोपासली सामाजिक बांधिलकी
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अनुदिनी या एका दैनिकातील सदरावर ही मालिका आधारित होती. सन 2001 मध्ये ती सुरू झाली आणि सन 2005 मध्ये तीने प्रेक्षकांचा निरोप घेतला. केदार शिंदेने ही मालिका दिग्दर्शित केली होती. यातील विनोद सहज सुंदर आणि खुसखुशीत होते. प्रेक्षकांना ते कमालीचे भावले होते. आता लॉकडाऊनमध्ये ही मालिका प्रेक्षकांचे निश्चित मनोरंजन करील हे निश्चित. या मालिकेमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी गंगाधर टिपरे यांची भूमिका साकारली होती.
वाचा ः पहिल्याच दिवशी डोंबिवलीकरांचा कामावर 'लेट मार्क'! अपुऱ्या बससेवेमुळे गोंधळ
अभिनेता राजन भिसे आणि अभिनेत्री शुभांगी गोखले हे त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या भूमिकेत दिसले होते. तर विकास कदमने (शिऱ्या) त्यांच्या नातवाची तर, रेश्मा नाईकने (शलाका) नातीची भूमिका साकारली होती. एकत्र कुटुंबाची ही कथा लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांच्या टेन्शनची मात्रा कमी करण्यासाठी ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विनोद हे किती सहज असतात, हे या मालिकेतून समजतं आणि आता त्याच विनोदांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटणार आहे.