‘इति’ - कॅन यू सॉल्व यूवर ओन मर्डर; संगीतकार राजेश रोशन यांचे कमबॅक

संतोष भिंगार्डे - सकाळ न्युज नेटवर्क
शुक्रवार, 10 जुलै 2020

आता आनंदाची बातमी अशी की, राजेश रोशन हे या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करणार आहेत.

मुंबई ः अभिनेता विवेक ओबेराॅयची कंपनी मेगा एन्टरटेन्मेंट आणि मंदिरा एन्टरटेन्मेंट यांनी त्यांच्या पहिल्या  ‘इति’ - कॅन यू सॉल्व यूवर ओन मर्डर या सिनेमाची घोषणा केली. हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर असून या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे टीझर पोस्टर देखील लाँच केले. ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

विकास दुबे एन्कॉंन्टर प्रकरणी संजय राऊतांची मोठी प्रतिक्रीया, वाचा सवित्तर

आता आनंदाची बातमी अशी की, राजेश रोशन हे या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करणार आहेत. राजेश रोशन हे गेली 50 वर्षे संगीत दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत कहो ना... प्यार है, कोई मिल गया आणि करण अर्जुन, इन्कार, कारोबार, क्या कहेना अशा कित्येक हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांनी संगीतकार म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे.  कित्येक सुपरहिट चित्रपटांना संगीत त्यांचे आहे. आता पुन्हा ते या इंडस्ट्रीत कमबॅक करीत आहेत. तब्बल सतरा वर्षानंतर ते  ‘इति’ - कॅन यू सॉल्व यूवर ओन मर्डर या चित्रपटाला संगीत देत आहेत.  राजेश रोशन म्हणतात, “विवेकबरोबरच मी प्रेरणा आणि विशाल यांच्याबरोबर काम करीत आहे  याचा मला आनंद आहे.

आता 'या' रुग्णालयातही कोरोना चाचणी होणार; मुंबई पालिकेचा कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर

इतिची कथा अतिशय छान आहे. त्यामुळे मला इतक्या वर्षांनंतर पुन्हा संगीत दिग्दर्शक म्हणून लोकांसमोर येताना आपण हा चित्रपट केलाच पाहिजे असं वाटलं. या चित्रपटाच्या कथेने मला आकर्षित केले. या चित्रपटातील संगीत गूढ प्रकारचे आहे."
दिग्दर्शक विशाल मिश्रा म्हणतात, “संगीत हे नेहमीच बॉलिवूडमधील चित्रपटांचा एक अविभाज्य भाग होता आणि आहे. असे खूप कमी संगीत दिग्दर्शक आहेत ज्यांनी खूप वैविध्यपूर्ण चित्रपटांना संगीत दिलं आहे. त्याचपैकी एक म्हणजे राजेश रोशन. या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनीच काम करावं अशी माझी खूप इच्छा होती आणि त्यांनी ती इच्छा पूर्ण केली याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.”

मलाईका अरोराने शेअर केलेली ही वोडका पॅनकेकची रेसिपी पाहिलीत का?

इति’ - कॅन यू सॉल्व यूवर ओन मर्डर हा एक सस्पेन्स थ्रिलर आहे. याची कथा एका स्त्रीच्या भोवती फिरणारी आहे हा चित्रपट २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यात रिलीज होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ‘Iti’ - Can You Solve Your Own Murder; Comeback by musician Rajesh Roshan