ऑस्करमध्येही खाल्लाय 'जोकर'ने भाव! सर्वाधिक 11 नामांकने 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

अशी आहेत ऑस्करची नामांकने...

वॉशिंग्टन : गोल्डन ग्लोब आणि क्रिटिक्‍स चॉईस पुरस्कारात बाजी मारणाऱ्या टॉड फिलिप्स यांच्या "जोकर' चित्रपटाला सर्वाधिक 11 ऑस्कर नामांकने जाहीर झाली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, संगीत या नामांकनांचा त्यात समावेश आहे. पहिल्या महायुद्धावर आधारीत "1917" आणि वन्स अपॉन ए टाईम इन हॉलिवूड या दोन्ही चित्रपटांना प्रत्येकी दहा नामांकने जाहीर झाली आहेत. द आयरीश मॅन या चित्रपटालाही दहा नामांकने जाहीर झाली आहेत. हा पुरस्कार सोहळा नऊ फेब्रुवारीला होणार आहे. ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्ट अँड सायन्स'च्या सभागृहात नऊ फेब्रुवारीला हा सोहळा रंगणार आहे. 

ऐकलं का? अग्गंबाई, सासूबाई होणार आता नवरीबाई!!

ठळक नामांकने : 
सर्वोत्कृष्ट चित्रपट : "फोर्ड व्हर्सेस फेरारी', "द आयरीशमॅन', "जोजो रॅबीट', "जोकर', "लिटल वुमन', "मॅरेज स्टोरी', "1917', "वन्स अपॉन अ टाइम इन.. हॉलिवूड', "पॅरासाइट'. 

सर्वोत्कृष्ट अभिनेता : अँटोनियो बॅंडेरास (पेन अँन्ड ग्लोरी), लियोनार्दो दि कॅप्रियो (वन्स अपॉन अ टाइम इन.. हॉलिवूड), ऍडम ड्रायवर (मॅरेज स्टोरी), जॉक्वीन फोनिक्‍स (जोकर), जॉनेथन प्राइस (द टू पोप्स). 

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : सिंथिया एरिवो (हॅरिएट), स्कारलेट जॉन्सन (मॅरेज स्टोरी), सॉइर्स रोनन (लिटल वुमन), चार्लिज थेरॉन (बॉम्बशेल), रेनी झेल्वेगर (जुडी). 

दिग्दर्शन : मार्टीन स्कोर्सेस (द आयरीशमॅन), टोड फिलिप्स (जोकर), सॅम मेंडीस (1917), बॉंग जून हो (पॅरासाइट), क्वेंटीन टॅरेनटिनो (वन्स अपॉन अ टाइम इन.. हॉलिवूड). 

सहायक अभिनेता : टॉम हॅंक्‍स (अ ब्युटिफुल डे इन द नेबरहूड), अँथोनी हॉप्कीन्स (द टू पोप्स), अल पचिनो (द आयरीशमॅन), जो पेस्की (द आयरीशमॅन), ब्रॅड पिट (वन्स अपॉन अ टाइम इन.. हॉलिवूड). 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहायक अभिनेत्री : कॅथी बेट्‌स (रिचवर्ड ज्वेल), लॉरा डर्न (मॅरेज स्टोरी), फ्लॉरेन्स पघ (लिटल वुमन), स्कारलेट जॉन्सन (मॅरेज स्टोरी), मार्गोट रॉबी (बॉम्बशेल). 

ऍनिमेटेड चित्रपट : हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन : द हिडन वर्ल्ड, आय लॉस्ट माय बॉडी, क्‍लॉज, मिसिंग लिंक, टॉय स्टोरी 4. 

छायांकन : द आयरीशमॅन, जोकर, द लाइटहाउस, 1917, वन्स अपॉन अ टाइम इन.. हॉलिवूड. 

वेशभूषा : सॅंडी पोवेल, ख्रिस्टोफर पीटरसन (द आयरीशमॅन), मायेस सी रुबियो (जोजो रॅबीट), मार्क ब्रीजेस (जोकर), जाकलीन डूरान (लिटल वुमन), ऍरियन फिलिप्स (वन्स अपॉन अ टाइम इन.. हॉलिवूड). 

संगीत (पार्श्‍वसंगीत) : हिल्डर गुडनाडोटीर (जोकर), ऍलेक्‍झांडर डेस्प्लाट (लिटल वुमन), रॅंडी न्यूमन (मॅरेज स्टोरी), थॉमस न्यूमन (1917), जॉन विल्यम्स (स्टार वॉर्स ः द राइज ऑफ स्कायवॉकर). 

व्हिज्युअल इफेक्‍ट्‌स : ऍव्हेंजर्स ः एंडगेम, द आयरीशमॅन, द लायन किंग, 1917, स्टार वॉर्स : द राइज ऑफ स्कायवॉकर. 

सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट : कॉर्पस ख्रिस्टी (पोलंड), हनिलॅंड (नॉर्थ मॅसेडोनिया), लेस मिझरेबल्स (फ्रान्स), पेन अँड ग्लोरी (स्पेन), पॅरासाइट (साउथ कोरिया) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 Oscar nominations to movie Joker