21 years Of Gadar: सिनेमाचा क्लायमॅक्स सनीनं अचानक बदलला अन् इतिहास घडला...

अनिल शर्मांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा १५ जून,२००१ रोजी प्रदर्शित झाला होता.
21 Years of Gadar: Sunny Deol changed the climax of ‘Gadar’, the film is on real life
21 Years of Gadar: Sunny Deol changed the climax of ‘Gadar’, the film is on real lifeGoogle
Updated on

सनी देओल(Sunny Deol),अमिषा पटेल,अमरीश पुरी यांच्या मुख्य भूमिका असलेला गदर-एक प्रेम कथा(Gadar-Eak Prem katha) या सिनेमाला प्रदर्शित होऊन आता तब्बल २१ वर्ष झाली आहेत. अनिल शर्मांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा १५ जून,२००१ रोजी प्रदर्शित झाला होता. ज्यानं बॉक्सऑफिसवर धुवांधार प्रदर्शन केलं होतं. रोमान्स आणि अॅक्शननं पुरेपूर भरलेल्या या सिनेमाच्या बॉक्सऑफिसवरील यशामागे सनी देओलचे(Sunny Deol) दमदार डायलॉगही महत्त्वाचे ठरले. सिनेमाच्या स्क्रिप्ट सोबत गाणी देखील श्रवणीय होती. चला जाणून घेऊया 'गदर'शी संबंधित असेच काही इंट्रेस्टिंग किस्से.(21 Years of Gadar: Sunny Deol changed the climax of ‘Gadar’, the film is on real life)

21 Years of Gadar: Sunny Deol changed the climax of ‘Gadar’, the film is on real life
काजोलसोबत काम न करण्याचा जेव्हा शाहरुखनं आमिरला दिला होता सल्ला...

'गदर' सिनेमात सनी देओलने तारा सिंग तर अमिषा पटेलनं सकीना ही व्यक्तिरेखा साकारली होती. तडफदार तारा सिंग आणि साधी-भोळी सकीना यांच्यातील प्रेम कहाणीनं प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी कितीतरी सिनेमे बनवले आहेत पण गदर मुळे त्यांना जगभरात ओळखलं गेलं. ब्लॉकबस्टर सिनेमा 'गदर' नंतर सनी देओलवर देखील या सिनेमातील तारा सिंगची अशी छाप पडली होती की त्याला त्यानंतर अशाच धाटणीच्या भूमिका ऑफर केल्या जाऊ लागल्या.

21 Years of Gadar: Sunny Deol changed the climax of ‘Gadar’, the film is on real life
अनिल कपूर सोबत काम करायला नकार देतात तरुण अभिनेत्री,समोर आलं कारण...

दुसरीकडे या सिनेमानं अनिल शर्मा यांना देखील खूप फायदा झाला होता. त्यांना कितीतरी बिग बजेट सिनेमांच्या दिग्दर्शनाच्या ऑफर मिळाल्या होत्या. देशभक्तीनं भारलेला 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों','वीर' सारख्या अनिल शर्मा यांच्या सिनेमांना मात्र 'गदर' सारखं यश मिळालं नाही. मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार अनिल शर्मा पुन्हा एकदा 'गदर' च्या माध्यमातून मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. ते सध्या 'गदर'चा सीक्वेल करण्याच्या तयारीत बिझी आहेत.

21 Years of Gadar: Sunny Deol changed the climax of ‘Gadar’, the film is on real life
काय आहे 'रविवार डायरीज'; पुजा कातुर्डेच्या नावाची रंगली चर्चा...

'गदर' सिनेमाचं कथानक शक्तिमान तलवार यांनी लिहिलं होतं. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. ज्यावेळी शक्तिमान आणि अनिल शर्मा सनी देओलला 'गदर' सिनेमाचं कथानक ऐकवायला गेले होते त्या दिवशी तो खूप कामात व्यस्त होता. पण तरीही त्यानं इतर सिनेमांच्या शूटिंगमधून वेळ काढत 'गदर' सिनेमा करायचं ठरवलं. सनी देओल असं तर कधीच कुठल्या सिनेमात ढवळाढवळ करत नाही पण 'गदर' सिनेमाचा क्लायमॅक्स त्यानं बदलला होता. चला जाणून घेऊया नेमका सनीने कसा केला सिनेमाचा द एन्ड.

21 Years of Gadar: Sunny Deol changed the climax of ‘Gadar’, the film is on real life
रोहित शेट्टीनं केली 'सिंघम 3' ची घोषणा;अजयच्या भूमिकेविषयी दिली मोठी माहिती

सिनेमाच्या कथानकानुसार सकीनाला गोळी लागते तेव्हा त्यात तिचा मृत्यू दाखवला गेला होता पण सनीनं इथेच कथा बदलली,आणि मग जे झालं त्यानं इतिहास घडवला. सनीला देखील याचा अंदाज नव्हता की सिनेमा बॉक्सऑफिसवर इतका सुसाट पळेल. बोललं जातं की 'गदर' बनवायला जवळजवळ १९ करोड लागले होते. पण या सिनेमानं चौपट कमाई केली होती. त्याचवेळी आमिरचा ब्लॉकबस्टर 'लगान'ही प्रदर्शित झाला होता. दोन्ही सिनेमा सुपरहिट ठरले. वेगळ्या जॉनरच्या या सिनेमांना लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com