रोहित शेट्टीनं केली 'सिंघम 3' ची घोषणा;अजयच्या भूमिकेविषयी दिली मोठी माहिती

२०१४ मध्ये सिंघमचा दुसरा भाग रिलीज झाला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी सिंघम ३ येत असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पहायला मिळतेय.
Rohit Shetty confirms Singham 3, says Ajay Devgn film is going to be ‘massive’
Rohit Shetty confirms Singham 3, says Ajay Devgn film is going to be ‘massive’Google
Updated on

रोहित शेट्टीच्या(Rohit Shetty) सिनेमांचे चाहते असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'सिंघम ३'(Sigham 3) ची घोषणा झालेली आहे. रोहित शेट्टी सध्या केपटाऊन मध्ये 'खतरों के खिलाडी १२' च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तिथे त्यानं मीडियाशी संवाद साधताना सांगितलं आहे की 'सिंघम ३' ची तयारी सुरू झाली आहे. रोहित शेट्टीनं हे देखील सांगितलं आहे की 'सिंघम ३' चं शूटिंग पुढच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात सुरु होईल. रोहित शेट्टीनं यावेळी अजय देवगण(Ajay Devgan) सोबत काम करण्यासंदर्भातही संवाद साधला आहे. सिनेमाचा पहिला भाग २०११ मध्ये आला होता,ज्याला लोकांनी खूप पसंत केलं होतं. २०१४ मध्ये या सिनेमाचा सीक्वेल आला होता,आता खूप वर्षांनी सिनेमाचा तिसरा भाग येत आहे,ज्याची प्रेक्षक खरंतर आतुरतेने वाट पाहत आहे.(Rohit Shetty confirms Singham 3, says Ajay Devgn film is going to be ‘massive’)

Rohit Shetty confirms Singham 3, says Ajay Devgn film is going to be ‘massive’
काजोलसोबत काम न करण्याचा जेव्हा शाहरुखनं आमिरला दिला होता सल्ला...

अजय देवगण आणि रोहित शेट्टीचे चाहते मात्र यामुळे नक्कीच सुखावले असणार, सिनेमाच्या मेकर्सनी एवढी मोठी धमाका करणारी बातमी त्यांना दिली आहे. रोहित शेट्टी म्हणाला आहे की,''सिंघम ३ सध्या पाइपलाइनमध्ये आहे आणि पुढील वर्षी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल''. एका वेबसाईटला मिळालेल्या वृत्तानुसार,रोहित शेट्टीने सांगितलं की,''मी सिंघमच्या नवीन भागावर सध्या लक्ष केंद्रित केलं आहे. आम्ही 'सर्कस' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एप्रिलमध्ये सिंघमचे काम सुरू करू. सिंघम हा सिंबा आणि सूर्यंवंशीचाच भाग आहे. पण अजय सोबत काम करुन खूप वर्ष झाली आहेत''.

Rohit Shetty confirms Singham 3, says Ajay Devgn film is going to be ‘massive’
अनिल कपूर सोबत काम करायला नकार देतात तरुण अभिनेत्री,समोर आलं कारण...

सिंघमचा २ रा भाग २०१४ मध्ये आला होता. आणि हा सिनेमा टी.व्ही वरचा सर्वात फेव्हरेट सिनेमांच्या लिस्टमध्ये सामिल आहे. आता वेळ बदलली आहे. कॅनव्हासही मोठा आहे सिनेमाचा. मला अजयसोबत काहीतरी मोठं करायचं आहे. रोहितने हे देखील सांगितलं की,हा मोठ्या प्रॉडक्शनपैकी एक सिनेमा आहे. पण सगळंच घाई-गडबडीवर आलं आहे. आम्ही लवकरच सर्कस प्रदर्शित करणार आहोत. सध्या मी इथे 'खतरों के खिलाडी' चे शूटिंग करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com