मुंबईतील हॉटेलमध्ये 30 वर्षीय मॉडेलची गळफास लावून आत्महत्या.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

30 year old model found dead in Mumbai hotel with a suicide note

मुंबईतील हॉटेलमध्ये 30 वर्षीय मॉडेलची गळफास लावून आत्महत्या..

mumbai crime : मुंबईतील अंधेरी भागातील एका हॉटेलच्या खोलीत 30 वर्षीय मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही मुलगी मॉडेल असून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्या संदर्भात वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली आहे. या प्रकरणी एडीआर अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. (30 year old model found dead in Mumbai hotel with a suicide note)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी लोखंडवाला येथील यमुना नगर सोसायटीची रहिवासी होती. गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटसृष्टीत काम न मिळाल्याने नैराश्यात जाऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

घटनास्थळी वर्सोवा पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली आहे. यामध्ये लिहलंय, 'मला माफ करा. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, कारण मी स्वतः आनंदी नव्हते. मला फक्त शांती हवी होती म्हणून मी हे पाऊल उचलते'. सध्या पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मॉडेलने बुधवारी, २८ सप्टेंबर रोजी रात्री हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती. तिने हॉटेलच्या खोलीतच आपल्यासाठी जेवण मागवलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या वेटरने रुमची बेल वाजवली. परंतु अनेकवेळा बेल वाजवूनही या मॉडेलने दार उघडलं नाही. हा प्रकार वेटरने हॉटेलच्या मॅनेजरला सांगितला. मॅनेजरने तात्काळ पोलिसांना फोन करुन माहिती दिली. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर पोलिसांनी मास्टर किच्याआधारे खोलीचा दरवाजा उघडला असता त्यांना ती मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात पोहोचवले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Mumbai Newspolicecrime