रजनीकांत यांच्या 'अन्नाथे' सिनेमाच्या टीममधील ४ सदस्य कोरोना पॉझिटीव्ह, शूटींगला लागला ब्रेक

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 24 December 2020

रजनीकांत यांच्या आगामी 'अन्नाथे' सिनेमाच्या टीममधील ४ सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. रजनीकांत सोबत टीममधील इतर सदस्यांनी स्वतःला २ आठवड्यांसाठी क्वारंटाईन केलं असल्याचं कळतंय.

मुंबई-  सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी सिनेमा 'अन्नाथे'ची शूटींग थांबवण्यात आली आहे. त्यांच्या या सिनेमाच्या टीममधील ४ सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. आता चाहते असा अंदाज बांधत आहेत की कोरोना तपासणीनंतर रजनीकांत स्वतःला क्वारंटाईन करतील. कोरोनाच्या संकटामुळे 'अन्नाथे' या सिनेमाचं शूटींग आधीच ९ महिने थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर शूटींग पुन्हा एकदा हैद्राबादमधील रामोजी फिल्मसिटीमध्ये १४ डिसेंबरपासून सुरु करण्यात आली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन सिरुथई सिवा करत आहेत. या सिनेमाच नयनतारा आणि किर्ती सुरेश मुख्य भूमिकेत असणार आहेत. 

हे ही वाचा: कोरोनाच्या धास्तीत प्रेक्षक, ‘इंदू की जवानी’ ने आठवडाभरात केली केवळ 'एवढी' कमाई  

रजनीकांत यांच्या आगामी 'अन्नाथे' सिनेमाच्या टीममधील ४ सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. रजनीकांत सोबत टीममधील इतर सदस्यांनी स्वतःला २ आठवड्यांसाठी क्वारंटाईन केलं असल्याचं कळतंय. मात्र रजनीकांत आणि इतर सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

'अन्नाथे' सिनेमाची प्रोडक्शन कंपनी सन पिक्चर्स आणि रजनीकांत यांचे पब्लिसिस्ट रियाज अहमद यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. रियाज अहमद यांनी सांगितलं की ''टीममधील ४ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रजनीकांत आणि इतर सदस्यांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. मात्र हे आत्तापर्यंत कन्फर्म झालं नाही की रजनीकांत पुन्हा चेन्नईला परतणार आहेत की स्वतःला हैद्राबादमध्ये क्वारंटाईन करणार आहेत. रियाजने सांगितलं की पुढच्या माहितीची वाट पाहत आहोत. ''

'अन्नाथे' या सिनेमाची शूटींग सुरु होण्याच्या दरम्यान या सिनेमाचं प्रोडक्शन हाऊस सन पिक्चर्सने एका चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली होती. ज्यामध्ये रजनीकांत, नयनतारा आणि सिनेमाशी संबंधित काही सदस्य हैद्राबादला पोहोचले होते. रजनीकांत यांच्यासोबत त्यांची मुलगी ऐश्वर्या देखील होती.   

4 crew members of rajinikanth annaatthe found corona positive rajinikanth to quarantine himself  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 crew members of rajinikanth annaatthe found corona positive rajinikanth to quarantine himself