
IFFI 2023 | Michael Douglas: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता मायकल डग्लस यांना गोव्यात झालेल्या ५४व्या IFFI (International Film Festival of India) मध्ये 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
त्यांनी आत्तापर्यंत एमी आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावले आहेत. हा पुरस्कार घेण्यासाठी मायकल भारतात आले आहे. सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मायकल डग्लस यांनी आनंद व्यक्त केला.
या महोत्सवात मायकल डग्लस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चित्रपट निर्मिती आणि वित्त क्षेत्रातील प्रयत्नांचे कौतुक केले. मला वाटते की भारत खूप चांगल्या हातात आहे आणि पुढे जात आहे. असे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी 'RRR' च्या संगीताची प्रशंसा केली.
पुढे मायकल डग्लस म्हणाले की, या महोत्सवाचे सौंदर्य म्हणजे यात ७८ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीची हिच ताकद आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची ही प्रशंसा केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मला वाटते की पंतप्रधान मोदी आणि मंत्री अनुराग ठाकूर यांनी गेल्या काही वर्षांत चित्रपटांच्या निर्मितीसाठी अधिक पैसे गुंतवले जात आहे. हा एक अतिशय यशस्वी काळ आहे. जात, धर्म, लिंग यांच्या पलीकडे जाऊन चित्रपट लोकांना एकत्र आणतो. विविध संस्कृतींना एकत्र आणण्यात चित्रपटांची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.