Kal Ho Naa Ho: 'कल हो ना हो' ला 20 वर्षे पूर्ण! वडिलांच्या आठवणीत करण भावूक!

28 नोव्हेंबर रोजी 'कल हो ना हो' या चित्रपटाला रिलीज 20 वर्षे पूर्ण झाली आहे.
Kal Ho Naa Ho turns 20
Kal Ho Naa Ho turns 20 Esakal
Updated on

20 Years Of Kal Ho Naa Ho: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर सध्या त्याच्या 'कॉफी विथ करण' या टॉक शोच्या 8व्या सीझनमुळे चर्चेत आहे. बॉलिवूडच्या बड्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये करणचे नाव आघाडीवर असते.

रॉकी और रानी की प्रेमकहानी या चित्रपटातुन त्याने पुन्हा बॉक्स ऑफिसवर एंट्री मारली. 1998 मध्ये रिलीज झालेल्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातून करणने दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यातील एक सुपरहिट सिनेमा म्हणजे 'कल हो ना हो'

Kal Ho Naa Ho turns 20
Animal Movie: मुंबई आता जुनी झालीय, आम्ही पाच वर्षात तुमच्या...रणबीरला तेलंगाणाच्या मंत्र्यांनी सुनावलं

आज धर्मा प्रॉडक्शनच्या 'कल हो ना हो' चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात शाहरुख खान, प्रीती झिंटा, सैफ अली खान सारखे स्टार्स दिसले होते.

2003 मध्ये हा चित्रपट रिलिज झाला होता ज्याचे दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले होते. आता करण जोहरने या चित्रपटाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. ही पोस्ट शेयर करत त्याने आपले वडील यश जोहरची आठवण काढली आहे.

Kal Ho Naa Ho turns 20
Shah Rukh Khan : 'तो फक्त लोकांचा वापर करुन घेतो अन्...' बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायकाचा शाहरुखवर सणसणीत आरोप

करण जोहरने व्हिडिओ शेयर करत लिहिले की, 'हा चित्रपट माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक भावनिक प्रवास आहे. अप्रतिम स्टारकास्टला एका कथेत एकत्र आणणे जी हृदयाला भिडते... संपूर्ण टीम आणि कॅमेर्‍यामागील कलाकारांचे खूप खूप अभिनंदन ज्यांनी 'कल हो ना हो' हा चित्रपट बनवला जो अजूनही लोकांच्या मनात स्थान कायम करुन आहे

'माझ्यासाठी हा शेवटचा चित्रपट होता ज्यात माझे वडील धर्मा प्रॉडक्शन परिवाराचे एक सदस्य होते. आजही जेव्हा मी हा चित्रपट पुन्हा पाहतो तेव्हा प्रत्येक फ्रेममध्ये त्याची उपस्थिती जाणवते. धन्यवाद, बाबा, आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल …आणि जे योग्य आहे त्यासाठी नेहमी उभे राहिल्याबद्दल. मला तुमची नेहमी आठवण येते...' दिग्दर्शनात पदार्पण केल्याबद्दल निखिलचे आभार.'

Kal Ho Naa Ho turns 20
Meghna Gulzar On Deepika Padukone: 'दीपिकाच्या JNU वादामुळेच...' चार वर्षानंतर दिग्दर्शिका मेघनानं व्यक्त केली मनातील खदखद

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 28 कोटी रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाने 38.85 कोटींचा व्यवसाय केला होता.हा चित्रपट Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com