Filmfare सोहळ्यात सलमानच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा तैनात..अशी आहे व्यवस्था..

गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत,त्यात तो सार्वजनिक ठिकाणी सोहळा होस्ट करत असल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे.
Salman Khan
Salman KhanEsakal

Filmfare 2023: मुंबईत ब्रान्द्रे येथील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये आज फिल्मफेअर पुरस्कार सोहळा रंगणार आहे. सुपरस्टार सलमान खान या पुरस्कार सोहळ्याला होस्ट करताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत त्यामुळे त्याची सुरक्षा चौपट वाढवण्यात आली आहे. तसंच जिथं फिल्मफेअर रंगणार आहे तिथे तर सुरक्षेचा एकदम चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

आपल्याला माहितीसाठी इथे सांगतो की सलमान खान मोठ्या कालावधीनंतर फिल्मफेअर होस्ट करणार आहे. 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या रिलीजनंतर सर्वचजण बॉलीवूडच्या भाईजानला भेटण्यासाठी उत्सुक आहेत. सलमान व्यतिरिक्त ६८ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इंडस्ट्रीतले बडे लोक सामिल होणार आहेत.(68 th filmfare awards due to salman khan death threat security is doubled up at the venue)

Salman Khan
कोण होते नामदेव व्हटकर? ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निर्वाण यात्रा अजरामर केली.. प्रसाद ओकनं सांगितला 'तो' इतिहास

रिलायन्सच्या जियो वर्ल्ड सेंटरमध्ये एक मोठा मॉल आणि रेस्टॉरंट्स तसंच अनेक शॉप्स देखील आहेत. तसं पाहिलं तर अशा मोठ्या पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन हे परदेशात किंवा स्टुडिओमध्ये आयोजित केले जातात,जिथे सुरक्षेचं नियोजन करणं एखाद्या सार्वजनिक जागेपेक्षा तुलनेनं सोपं असतं. हेच कारण आहे की जियो वर्ल्ड सेंटर सारख्या सार्वजनिक ठिकाणी पार पडणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्यात आली आहे.

Salman Khan
Madhurani Prabhulkar: ह्या उष्णतेच्या काळात स्वतःला असं कूल ठेवते मधुराणी.. म्हणाली, 'हेच आहेत माझे Life Savers..'

गेल्या दोन वर्षांपासून फिल्मफेअर पुरस्कार सोहळा जियो वर्ल्डच्या कन्वेंशन सेंटरमध्ये होणार आहे. याआधी मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये याचं आयोजन केलं गेलं होतं. २०२० च्या फिल्मफेअर विषयी बोलायचं झालं तर तो पुरस्कार सोहळा आसाममधील गुवाहाटी इथं रंगला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com