esakal | Video Viral; आजीचा जबरी डान्स; दलेर मेंहदीला आली असती चक्कर

बोलून बातमी शोधा

 grandmother dance news}

अनेकांनी आजीबाईंच्या त्या गाण्याच्या व्हिडिओचे स्टेटस ठेवले आहे. 

Video Viral; आजीचा जबरी डान्स; दलेर मेंहदीला आली असती चक्कर
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातून अनेक नवनवीन गोष्टी लक्षात य़ेतात. गेल्या काही दिवसांपासून हा एक वेगळा ट्रेडिंगचा विषय होताना दिसत आहे. सध्या एक आजीबाई सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांनी प्रख्यात पंजाबी गायक दलेर मेहंदी यांच्या गाण्यावर डान्स केला आहे. तो व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा अवघ्या काही मिनिटांत त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत.

अनेकांनी आजीबाईंच्या त्या गाण्याच्या व्हिडिओचे स्टेटस ठेवले आहे. तो व्हिडिओ पाहिल्यावर आजीबाई किमान 75 च्या असाव्यात असे वाटते. मात्र त्यांचा उत्साह हा एखाद्या तरुणीला लाजवेल असा आहे. मेंहदीच्या गाण्यावर थिरकताना त्यांनी उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आजींना सोशल मीडियावरुन त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येनं लाईक्स आणि कमेंटसही दिल्या आहेत. काही जणांचे म्हणणे असे आहे की, आजी ज्या गाण्यावर नाचत आहेत ते मुळ गाणे सैराट मधील झिंगाट आहे. ते एडिट करुन त्याजागी दुसरे गाणे लावण्यात आले आहे. यावर काहींनी गाणे कोणते का असेना आजींच्या डान्सनं सर्वांना जिंकून घेतल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी नवरदेवासमोर नाचणा-याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यालाही सोशल मीडिय़ावर प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. नवरदेवासमोर नाचणारा मोर पाहिला आहे का असे म्हणून हजारो जणांनी तो व्हिडिओ पाहिला होता. आता आजी बाईचा एक डान्स व्हायरल झाला आहे. अक्षय कुमारच्या बाला या गाण्यावर थिकरणा-या एका काकुंचा व्हिडिओही सर्वांच्या लक्षात आहे.

नव-यानं 500 रुपयांना विकलं होतं; गंगुबाईची वेदनादायी कहाणी

हेही वाचा : दिव्या भारती- साजिद नाडियादवालाच्या लग्नाची गोष्ट; नेमकं तेव्हा काय घडलं होतं?

सोशल मीडियावर अशाप्रकारचे व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते तर काहींचे मनोरंजन होते. व्हिडिओतील व्य़क्ती कोण, कुठल्या, त्या काय करतात याचे युझर्सला काही देणेघेणे नाही त्याच्या लेखी व्हिडिओ मनोरंजन करणारा असणे पुरेसं आहे. असेही दिसून येते.