esakal | दिव्या भारती- साजिद नाडियादवालाच्या लग्नाची गोष्ट; नेमकं तेव्हा काय घडलं होतं?

बोलून बातमी शोधा

divya bharti and sajid}

आपल्या परवानगीशिवाय मुलीने साजिदशी लग्न केलंय, हे तिच्या वडिलांना माहितंच नव्हतं. 

दिव्या भारती- साजिद नाडियादवालाच्या लग्नाची गोष्ट; नेमकं तेव्हा काय घडलं होतं?
sakal_logo
By
स्वाती वेमूल

जवळपास २८ वर्षांपूर्वी अभिनेत्री दिव्या भारतीचं अचानक निधन झालं आणि तिच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलं नाही. वयाच्या सोळाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या दिव्याला अल्पावधीतच प्रसिद्धी व लोकप्रियता मिळाली होती. १९९० मध्ये तिने 'बोब्बिली राजा' या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केलं. तिचं अभिनय व सौंदर्य प्रेक्षकांना भुरळ घालणारं होतं. व्यंकटेश, चिरंजीवी, मोहन बाबू यांसारख्या सुपरस्टार्ससोबत तिने काम केलं होतं. दोन वर्षांनंतर तिने बॉलिवूडमध्ये 'शोला और शबनम' या चित्रपटातून एण्ट्री केली. हिंदीतही तिने सनी देओल, शाहरुख खान, ऋषी कपूर, अनिल कपूर यांच्यासोबत काम केलं. दिव्याच्या चित्रपटांसोबतच तिच्या खासगी आयुष्याचीही जोरदार चर्चा व्हायची. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी तिने निर्माता साजिद नाडियादवालाशी लग्न केलं होतं. विशेष म्हणजे, या दोघांनीही लग्नाची गोष्ट दिव्याच्या वडिलांपासून लपवली होती. 

'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत दिव्याची आई मीना यांनी त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगितलं. दिव्याचे वडील ओमप्रकाश भारती यांना काही महिन्यांनंतर मुलीच्या लग्नाची बातमी समजली. शोला और शबनमच्या सेटवर दिव्या आणि साजिद यांची पहिली भेट झाली होती आणि पहिल्या भेटीतच दिव्याला साजिद आवडू लागला होता. याबाबत मीना म्हणाल्या, "शोला और शबनमच्या सेटवर साजिद गोविंदाला भेटायला जायचा. त्यावेळी गोविंदाने साजिदची ओळख दिव्याशी करून दिली होती. ज्या दिवशी दिव्याची साजिदशी पहिली भेट झाली, त्याच दिवशी तिने मला विचारलं होतं, की तुम्हाला साजिदविषयी काय वाटतं? तो मला चांगला वाटला, असं  मी तिला म्हणाले होते. त्याच्या काही दिवसांनी तिने माझ्याकडे साजिदसोबत लग्न करण्याची तिची इच्छा बोलून दाखवली. त्यावेळी मी तिला वडिलांना विचारण्यास सांगितलं होतं. त्यांचा या लग्नाला विरोध होता. मग अचानक एके दिवशी दिव्याने मला फोन करून सांगितलं की ती साजिदशी लग्न करतेय आणि प्रत्यक्षदर्शी म्हणून तिला माझी स्वाक्षरी हवी आहे. वडिलांना लग्नाबद्दल सांगितल्याशिवाय मी येणार नाही असं मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं."

हेही वाचा : आता ही असेल बबड्याची शुभ्रा; तेजश्री प्रधानच्या जागी आली नवी अभिनेत्री

लग्नानंतरही दिव्या तिच्या आईवडिलांसोबत राहत होती. मधे मधे ती साजिदला भेटायला जायची. आपल्या परवानगीशिवाय मुलीने साजिदशी लग्न केलंय, हे तिच्या वडिलांना माहितंच नव्हतं. काही महिन्यांनंतर, दिवाळीनिमित्त साजिद दिव्याच्या घरी गेला. त्यावेळी त्याने लग्न केल्याचं तिच्या आईवडिलांना सांगितलं. मात्र लग्नाच्या दहा महिन्यांनंतरच तिचा अकस्मात मृत्यू झाला. पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून ती खाली पडली होती. त्यावेळी ती फक्त १९ वर्षांची होती.