Sonu Nigam: धक्कादायक..!! सोनू निगमच्या कुटुंबाला ७२ लाखांचा फटका, ड्रायव्हरला अटक, वाचा संपूर्ण प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sonu nigam, sonu nigam news

Sonu Nigam: धक्कादायक..!! सोनू निगमच्या कुटुंबाला ७२ लाखांचा फटका, ड्रायव्हरला अटक, वाचा संपूर्ण प्रकरण

Sonu Nigam News: अभिनेता आणि गायक असलेल्या सोनू निगमला मोठा धक्का बसलाय. सोनू निगमच्या बाबांच्या घरातून तब्बल ७२ लाखांची चोरी झालीय. या प्रकरणी सोनू निगमच्या ड्रायव्हरला ओशिवरा पोलिसांनी अटक केलीय.

(72 lakh hit to Sonu Nigam's family, driver arrested, read full case)

सोनू निगमची बहीण निकिताने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी वक्तव्य केले कि, सोनू निगमच्या वडिलांचे वय 76 वर्षे आहे.

याप्रकरणी सोनू निगमच्या बाबांच्या माजी ड्रायव्हरवर घरातून ७२ लाख रुपये चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता जागरणच्या वृत्तानुसार ड्रायव्हरला अटक करण्यात आलीय.

सोनू निगमची धाकटी बहीण निकिता हिने ओशिवरा पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, आगम कुमार निगमकडे रेहान नावाचा ड्रायव्हर सुमारे 8 महिने काम करत होता, परंतु त्याचे काम योग्य नव्हते.

या कारणास्तव त्याला नुकतेच कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याची चर्चा आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगम कुमार निगम रविवारी वर्सोवा भागात मुलगी निकिताच्या घरी जेवायला गेले होते.

त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी आपल्या मुलीला फोनवरून सांगितले की, लाकडी कपाटात ठेवलेल्या डिजिटल लॉकरमधून 40 लाख रुपये गायब आहेत.

गायकाचे वडील आगम कुमार निगम हे ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई येथे राहतात. आणि हि चोरी 19 मार्च ते 20 मार्च दरम्यान घडल्याचं सांगण्यात येतंय.

काही दिवसांपूर्वी सोनू निगमला चेंबूरमधील एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली होती. सोनू निगम याला ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या मुलाने धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली.

या धक्काबुक्कीमध्ये सोनू निगम स्टेजच्या पायरीवरून खाली पडला, त्याला वाचवायला पुढे गेलेल्या अंगरक्षकांमधील दोन जण खाली पडल्याची माहिती समोर आली.

या प्रकारात सोनू निगमला कोणतीही इजा झाली नसली तरीही त्यांच्यासोबतच्या टीममध्ये असलेला एक व्यक्ती जखमी झाला.