
ही मराठी अभिनेत्री दोन दिवसांपासून आजारी, चाहत्यांना केलं आवाहन
Pooja Sawant News: मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत कायम चर्चेत असते. पूजा सावंत सध्या तिच्या नवीन पोस्ट्समुळे चर्चेत आलीय. सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना थैमान घालताना दिसतोय.
त्यातच मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने एक पोस्ट केलीय त्यामुळे फॅन्सना काळजी लागून राहिलीय.
पूजा सावंतला दोन दिवसापासून ताप आणि वायरल इन्फेक्शन झालंय. पूजाने सर्वांना काळजी घ्यायला सांगितली असून मास्क लावण्याचं आवाहन केलंय.
(Pooja Sawant got viral infection, appeal to wear mask)
हेही वाचा: एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
पूजाला बरं वाटत नाहीये. तिला वायरल इन्फेक्शन झालंय. त्याविषयी तिने सोशल मीडियावर माहिती शेयर केलीय. पूजाने गोळ्या घेतानाचा फोटो सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
त्यामुळे हि पोस्ट पाहून पूजाला सर्व फॅन्सने काळजी घेण्याचं आवाहन केलंय. पूजा सध्या घरी आराम करत असून ती लवकरात पावकर बरी होऊन तिच्या कामाला सुरुवात करेल अशी फॅन्सना आशा आहे
पूजाने दगडी चाळ, बोनस, क्षणभर विश्रांती, भेटली तू पुन्हा, लपाछपी, विजेता, नीलकंठ मास्तर अशा सिनेमांमधून अभिनय केलाय. पूजाला अभिनयाची आवड आहेच याशिवाय पूजा पेट लव्हर सुद्धा आहे.
पूजा प्राणी पक्ष्यांशी निगडित विविध सामाजिक संस्थांना जोडून आहे. अभिनेत्री असूनही पूजा प्राणी - पक्ष्यांसाठी करत असलेलं काम निश्चितच कौतुकास्पद आहे.

पूजा सावंतने काहीच महिन्यांपूर्वी 'दगडी चाळ २' सिनेमात काम केले होते. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पूजाने 'बस बाई बस'मध्ये हजेरी लावली होती.
यावेळी कार्यक्रमातील एका टास्कदरम्यान पूजाने तिचा क्रश कोण आहे आणि त्याच्याशी लग्न करण्याची तिची इच्छा असल्याचे सांगितले.
त्यावेळी पूजाने सिद्धार्थ मल्होत्राचं नाव घेतलं आणि सिद्धार्थ सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.