esakal | आदेश बांदेकर ते भरत जाधव.. मराठी कलाकारांनी घेतला लशीचा पहिला डोस
sakal

बोलून बातमी शोधा

marathi celebs

कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू असल्याने लसीकरण मोहिमेस गती

आदेश बांदेकर ते भरत जाधव.. मराठी कलाकारांनी घेतला लशीचा पहिला डोस

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू असल्याने लसीकरण मोहिमेस गती देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अनेक कलाकारांनी कोरोना प्रतिबंधक लस घेत चाहत्यांनाही आवाहन केलं आहे. मराठीतील कोणकोणत्या कलाकारांनी आतापर्यंत लस घेतली, ते पाहुयात

आदेश बांदेकर
'होम मिनिस्टर' फेम आदेश बांदेकर यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यांनी याबद्दलची माहिती दिली. 

किशोरी शहाणे
मुंबई महानगरपालिकेचे आभार मानत अभिनेत्री किशोरी शहाणे यांनीसुद्धा लस घेतानाचा फोटो पोस्ट केला. 

सुबोध भावे
मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावेनं पत्नीसह लशीचा पहिला डोस घेतला. 'लस घेतली तरी काळजी घ्यायचीच आहे', असं लिहित त्याने चाहत्यांना जागरूक राहण्याचं आवाहन केलं. 

हेही वाचा : 'कोर्ट' चित्रपटातील अभिनेते विरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन

हर्षदा खानविलकर
'रंग माझा वेगळा' मालिकेत भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनीसुद्धा लशीचा पहिला डोस घेतला. त्यासोबत चाहत्यांनाही योग्य ते नियम पाळण्याचं आवाहन केलं. 

भरत जाधव
'सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही सरकारी नियमाप्रमाणे कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकर करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा', अशी पोस्ट लिहित भरत जाधवने फोटो पोस्ट केला. काही दिवसांपूर्वीच त्याने लशीचा पहिला डोस घेतला. 

रेशम टिपणीस
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री रेशम टिपणीसने कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला.

loading image