हा शरद पोंक्षे तुच ना? शिंदे समर्थनावरुन आदेश बांदेकर संतापले, केली पोलखोल

एकनाथ शिंदे यांचे कौतुक करणाऱ्या शरद पोंक्षे यांना आदेश बांदेकर यांनी जुना विडिओ शेयर करत सुनावले आहे.
aadesh bandekar shared old video of sharad ponkshe on uddhav thackeray and eknath shinde
aadesh bandekar shared old video of sharad ponkshe on uddhav thackeray and eknath shindesakal

eknath shinde : आज महाराष्ट्राच्या(Maharashtra) राजकारणात(Politics) मोठी उलथापालथ सुरु आहे. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडामुळे सध्या सामान्य कार्यकर्ताच नाही तर राजकारणाशी दुरुनही संबंध नसलेला माणूस हे असं कसं घडलं असा विचार करत संभ्रमात पडलाय. ४०-४५ आमदारांना आपल्या सोबत घेऊन जाणारे एकनाथ शिंदे सध्या जगाच्या नकाशावरही चर्चेत आले आहेत. यातनं काही जणांचा एकनाथ शिंदेंच्या या बंडाला पाठिंबा दिसतोय तर काही जणांचा विरोध. (Sharad Ponkshe) पण अभिनेते शरद पोंक्षे यांनी पत्र पाठिंबा दर्शवला आहे. नुकतीच त्यांनी एक पोस्ट लिहिली होती, पण यावर अभिनेते आदेश बांदेकर चांगलेच भडकले आहे. एक जुना व्हिडिओ शेयर करून त्यांनी तोडीस तोंड उत्तर दिले आहे.

aadesh bandekar shared old video of sharad ponkshe on uddhav thackeray and eknath shinde
आपल्या देशातल्या न्याय व्यवस्थेचा चमत्कार बघा.. किरण मानेंची जोरदार टीका

मराठी अभिनेते शरद पोंक्षे जे हिंदुत्ववादी आहेत,सावरकरांच्या विचारांचे निष्ठावंत सेवक आहेत अन् गेल्या काही महिन्यांपासून भाजपाला पाठिंबा देणारे आहेत. भाजपने शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिल्यानंतर शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट लिहिली. ज्यामध्ये पोंक्षे यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला नकळत पाठिंबा दर्शवला. शरद म्हणतात, 'कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात ! त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यात सविस्तर लिहिलंय,' त्यांनी स्वतःच्या दुसरं वादळ या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे.

एकनाथ शिंदे यांचे पोंक्षे यांनी केलेले कौतुक पाहून आदेश बांदेकर चांगलेच संतापले आहेत. शरद पोंक्षे यांच्या भूमिकेत किती द्विधा आहे हे दाखवण्यासाठी आदेश यांनी थेट 'लाव रे तो विडिओ'चा आधार घेतला आहे. एका जुन्या मुलाखतीचा विडिओ शेयर करत आदेश यांनी कॅप्शन दिले आहे. 'हा शरद पोंक्षे तुच ना?' असा थेट सवाल आदेश यांनी विचारला आहे.

या व्हिडिओमध्ये पोंक्षे म्हणतात, 'सगळ्यात पहिले धावून आला तो आदेश बांदेकर. मी आदेशला फोन केला आणि सांगितले की अशी-अशी शक्यता आहे. तर काय करू मला आता कळत नाहीय. आदेश बांदेकर म्हणाले, काळजी करू नकोस, मी उद्याच्या उद्या तुला नांदेंकडे पाठवतो. हिंदू कॉलनीतील नांदे हे खूप मोठे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे पाठवले आणि मग ती सगळी प्रोसेस सुरु झाली. तर अशा प्रकारे पहिला आदेश उभा राहिला. आदेशमुळे उद्धव ठाकरेंना कळलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, शरद कसली काळजी करू नकोस शिवसेना आणि मी तुझ्या पाठीशी उभे आहोत. पैशापासून कसली काळजी करायची नाही.' हा व्हिडिओ शेयर करत आदेश बांदेकर यांनी सवाल केला आहे, हा शरद पोंक्षे तूच ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com