Gauri Kulkarni: 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीचा मोठा अपघात.. बाइकस्वाराची धडक.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aai Kuthe Kay Karte actress Gauri Kulkarni suffers leg injury after meeting with an accident

Gauri Kulkarni: 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीचा मोठा अपघात.. बाइकस्वाराची धडक..

Gauri Kulkarni: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. ती या मालिकेतून आता घराघरात पोहोचली आहे.

सध्या गौरी बऱ्याच मालिकांमध्ये काम करते आहे. पण तिच्या बाबतीत एक वाईट बातमी समोर आली आहे. गौरीचा एक मोठा अपघात झाला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

(Aai Kuthe Kay Karte actress Gauri Kulkarni suffers leg injury after meeting with an accident)

गौरी कुलकर्णी हिचा नुकताच एक मोठा अपघात झाला आहे. हा अपघात गंभीर स्वरूपाचा होता. ज्यात गौरीच्या दुचाकी गाडीचं नुकसान झालं आहे. गौरीच्या स्कुटीला एका बाइकस्वाराने समोरून येऊन धडक दिली. त्यामुळे गौरीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

गौरीवर सध्या उपचार सुरू असून पुढील तीन आठवडे गौरी सक्तीच्या रजेवर आहे. गौरीचा एक हॉस्पिटलमधील फोटो देखील व्हायरल होत असून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेतील गौरी आणि यश ही जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. सध्या या मालिकेत गौरी आणि यश यांच्या नात्यात बरेच वाद निर्माण झाले आहेत. यश गौरीशी लग्न करण्यावर ठाम आहे तर गौरी मात्र लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचत नाहीय.

अशातच गौरीचा अपघात झाल्याने पुढील तीन आठवडे तरी गौरी मालिकेत दिसणार नाही. गौरीने एका माध्यमाल दिलेल्या मुलाखतीत तिच्या अपघाताबद्दल सांगितलं आहे. 'एक बाइकस्वार उलट मार्गाने आला आणि माझ्या स्कुटीला धडक दिली. समोरून धडक दिल्याने माझी स्कुटी रस्त्यावर स्लीप झाली आणि माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली.'असं ती म्हणाली.

सध्या गौरीवर उपचार सुरू असून तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. ही घटना काही दिवसांपूर्वीच घडली आहे. सध्या गौरी तिच्या घरी आराम करत आहे.