आई कुठे काय करते:देशमुखांचं घर सोडलं, अरुंधती गेली नयनरम्य व्हिलात

सोशल मीडियावर मालिकेतल्या शुटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानं चर्चेला उधाण
Madhurani Prabhulkar as 'Arundhati'
Madhurani Prabhulkar as 'Arundhati'Google
Updated on

'आई कुठे काय करते'(Aai kuthe kay karte) या मालिकेन आता चांगलाच वेग पकडला आहे. त्यात मालिकेत आशुतोष या नव्या पात्राची एन्ट्री झाल्यानंतर रोजच एक नवं वळण पहावयास मिळत आहे. आता ज्या पद्धतीनं मालिकेत अरुंधतीच्या (Arundhati) भूमिकेचा ग्राफ दाखवला जात आहे त्यावर प्रेक्षक खूश आहेतच पण त्यासाठी तिच्या वाटेला येणाऱ्या अनेक अडचणींनी मात्र त्यांची घालमेल होत आहे. तिच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याचं उगाच तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं प्रेक्षकांना आवड नव्हतं,किंवा अरुंधती घटस्फोटानंतरही एवढं सगळं सहन करीत देशमुखांच्या घरात का राहिलेली दाखवत आहेत असे प्रश्नही सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात उठले असतील बहुधा. पण आता या सगळ्यावर कदाचित एक ठोस उत्तर मालिकेच्या पुढच्या भागात प्रेक्षकांना नक्कीच मिळणार आहे.

सध्या मालिकेत अरुंधतीचा गायिका बनण्याचा प्रवास कसा सुरु होतोय हे दाखवलं जात आहे. तिचा मित्र आशुतोष कसं तिच्या यशासाठी तिच्यामागे खंबीरपणे उभा राहिलाय,तिला कसं मदत करतोय,त्यात रेकॉर्डिंगला गेल्यावर कसं ती दोघं एका अडचणीत सापडतात,घरी जाणं त्या रात्री होत नाही आणि मग त्यावरुन देशमुखांच्या घरात कसं रामायण-महाभारत घडतं ते प्रोमोच्या माध्यमातून आपण पाहिलं असेलच. पण आम्ही सांगतो आता त्यापुढे काय होणार. हो, सासुपासून अनिरुद्ध पर्यंत सगळ्यांनी आशुतोषसोबत एक रात्र बाहेर राहिल्यानंतर नको-नको ते बोलल्यावर अर्थातच अरुंधती तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेते. आणि पुढे ती पोहोचते....कुठे? या बातमीत शूटिंग दरम्यानचा व्हिडीओ दिला आहे. तो पाहिल्यावर अंदाज येईलच.

Madhurani Prabhulkar as 'Arundhati'
'मला भाई नाही,गॉडफादर बोलतात';अक्षयचा 'बच्चन पांड्ये' आला रे आला...

आता बोललं जात आहे की देशमुखांच्या घरातनं बाहेर पडल्यावर पुन्हा अरुंधतीच्या मदतीसाठी उभा राहणार आहे तिचा मित्र आशुतोष. बोललं जात आहे तिच्या रेकॉर्डिंगसाठी प्रवास लांबचा पडू नये म्हणून आशुतोषच्या समुद्रकाठच्या व्हिलात अरुंधती राहणार आहे. अरुंधती साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरनं शुटिंग दरम्यानचा तो व्हिडीओ पोस्ट केला अन् एकच चर्चा रंगली. अरुंधती समुद्रकाठच्या एका मोठ्या व्हिलात बागडताना दिसत आहे,अर्थात तिच्या नव्या लूकमध्ये बरं का. त्या व्हिडीओच्या बॅकग्राूंडला 'दिल है छोटासा' गाणं वाजत आहे. असो,देशमुखांच्या कटकटीतून सुटलेल्या अरुंधतीच्या वाट्याला आलेलं हे सुख प्रेक्षकवर्ग मात्र नक्कीच एन्जॉय करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com