मिलिंद गवळींची पोस्ट: म्हणाले, लेकी कशा पटकन मोठ्या होतात l Milind Gawali | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milind Gawali

मिलिंद गवळींची पोस्ट: म्हणाले, लेकी कशा पटकन मोठ्या होतात

'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte या लोकप्रिय मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांची अभिनयाची चर्चा नेहमीच असते. याचशिवाय ते नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही लिहीत असतातच. आता ही त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांची मुलगी ईशानी हिच्या लग्नाविषयी भावनिक पोस्ट लिहिली आहे. लेकी कशा पटकन मोठ्या होतात आणि एक राजकुमार येतो, दोघ उंच भरारी घेतात, आपण आनंदानं त्यांचं उड्डाण पाहत राहायचं. त्यांच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोरोना काळामुळे लांबणीवर पडलेला अभिनेत्री अलका कबुल यांच्या मुलीचा काही दिवसांपूर्वी विवाहसोहळा पार पडला. ईशानीच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. त्यांनी लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.अभिनेते मिलिंद गवळी यांनी आज एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट-

'माणसाच्या आयुष्यात सगळ्यात मौल्यवान किंवा जीव की प्राण काय असेल तर ती असते 'लेक'. लेकी कशा पटकन मोठ्या होतात आणि एक राजकुमार येतो, दोघ उंच भरारी घेतात, आपण आनंदानं त्यांचं उड्डाण पाहत राहायचं. समीर आठल्ये आणि अलकाताईंची लेक ईशानी.. ती खरंच एक पायलट आहे आणि तिचा विवाह ज्याच्याशी झाला.. निशांत वालिया, तोसुद्धा पायलटच आहे. म्हणजे खरंच ते आकाशात दोघेही भरारी घेतात. ईशानी परदेशात विमान चालवायचं प्रशिक्षण घेण्यासाठी निघाली होती, तेव्हा मी तिला म्हणालो होतो एक दिवस मला तू जे विमान चालवतेस त्या विमानाने प्रवास करायचा आहे. माझ्या काही स्वप्नांपैकी ते एक स्वप्न आहे. लेकी जेव्हा अशा भरारी घेतात, यशस्वी होतात, त्यामागे आई-वडिलांचे खूप परिश्रम असतात, आईचे थोडे जास्तच'.

मिलिंद यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील एका चाहत्याने कमेंट केली आहे. किती छान लिहिता..परफेक्ट आहात तुम्ही... तुमच्या शिवाय दुसरा कोणी अनिरुद्ध नसुच शकतो... खरे तर सगळीच पात्र उत्तम आहेत. दुसरा चाहतो म्हणतो,अशीच एक छान मुलगी सून म्हणून लवकरच माझ्या घरात येणार आहे.मला मुलगी नाही तिला आम्ही मुलगी म्हणूनच घरात आणणार.

Web Title: Aai Kuthe Kay Karte Fame Milind Gawali Virial Post Entertainment Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top