Aai Kuthe Kay Karte: देशमुखांच्या घरी पुन्हा लगीनघाई.. आई पाठोपाठ लेकही बोहल्यावर..

आई कुठे काय करते मालिकेत मोठा ट्विस्ट..
Aai Kuthe Kay Karte latest update isha engagement with anish coming soon
Aai Kuthe Kay Karte latest update isha engagement with anish coming soon sakal

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका बरीच चर्चेत आहे. कारण अखेर अरुंधतीचं आशुतोष सोबत लग्न होऊन ती संसाराला लागली आहे. पण आई पाठोपाठच आता इशाचे ही लग्न होणार आहे. सध्या मालिकेत इशाच्या साखरपुड्याचे वारे वाहू लागले आहेत.

पण हे देखील अरुंधतीसाठी सोपे नाही. अनेक दिव्य पार करून तिला इशाचे लग्न करावे लागणार आहे. कारण हे लग्न अनिरुद्धला मान्य आहे. त्यामुळे या लग्नाला होणारा विरोध आणि अनिरुद्ध कडून केले जाणारे आरोप यामुळे अरुंधतीला मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

(Aai Kuthe Kay Karte latest update isha engagement with anish coming soon )

Aai Kuthe Kay Karte latest update isha engagement with anish coming soon
Chikatgunde: जोरदार पाऊस आणि खोलीतून 'तो' आवाज येऊ लागला.. 'चिकटगुंडे - २' चा भन्नाट ट्रेलर..

आपण पाहिले की, नुकतेच आणि अरुंधती आणि आशुतोषचे लग्न झाले. या लग्नात तिच्या पहिल्या नवऱ्याने म्हणजे अनिरुद्धने अनेक विघ्न आणली. तिला शक्य त्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला. आता ती या सगळ्या त्रासातून सुटून आपल्या नव्या घरी गेली आहे. पण तिच्या मागचे दिव्य काही थांबता थांबेना..

अरुंधतीच्या दोन्ही मुलांच्या आयुष्यात सध्या अनेक अडथळे आले आहेत. यशला गौरी सोडून गेल्यानंतर त्याला कसंबसं सावरलं आता इशाच्याही वैयक्तिक आयुष्यात अनेक अडथळे येत आहेत.

Aai Kuthe Kay Karte latest update isha engagement with anish coming soon

अरुंधतीची मुलगी इशा ही प्रेमात पडली आहे. आशुतोषचा पुतण्या अनिश हा तिचा प्रियकर आहे. म्हणूनच हे संबंध अनिरुद्धला मान्य नाही. शिवाय अनिशचे प्रेम असले तरी तो इतक्यात लग्नाला तयार नाही. त्यामुळे वैतागून एकटी पडलेली इशा घर सोडून जाते.

ती पळून जाते आणि अनिशला भेटते. तो तिची खूप समजूत काढतो. ते कसेबसे तिला घरी आणतात. पण इशा सध्या एकटी पडल्याने ती लग्नाच्या निर्णयावर ठाम असते. ती अनिश पुढे पळून जाण्याचाही विचार मांडते.

हे लग्न अनिरुद्धला मान्य नाही पण इशा लग्नाबाबत ठाम असल्याने ती इशा आणि अनिशच्या साखरपुड्याचा प्रस्ताव घरच्यांपुढे मांडते.संजना आणि अनघा इशाला ही आनंदाची बातमी देतात. आता लवकरच इशाचा साखरपुडा होणार आहे, त्यामुळे देशमुखांच्या घरात पुन्हा लग्नाचं बिगुल वाजणार हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com