Aai kute kai karte: बंद करा ही भंगार मालिका..'आई' राहिली बाजूला अन् त्यात फक्त.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Serial: Aai Kuthe Kay Karte New Track, Milind Gawali Video Post

Aai kute kai karte: बंद करा ही भंगार मालिका..'आई' राहिली बाजूला अन् त्यात फक्त..

आई कुठे काय करते ही मराठी मालिका सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. या मालिकेला प्रचंड चाहतावर्ग होता. आता या मालिकीचं कथानक दुसरीकडेच कुठेतरी भरकटत आहे. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की, प्रेक्षक कंटाळतात आणि त्या मालिकेवर आपला संताप व्यक्त करु लागतात. असंच काहीस 'आई कुठे काय करते' या मालिकेबाबत दिसून येत आहे. या मालिकेवर काही प्रेक्षकांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे.

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक असल्याचं बोललं जातं. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सतत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असते. ही मालिका आई अर्थातच अरुंधती या पात्राभोवती फिरणारी आहे.

मालिकेच्या सुरुवातीलाही वेगळा आशय असणारी कथा प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. त्यामुळे अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली होती. या मालिकेवरुनच हिंदी मालिका 'अनुपमा' सुरु करण्यात आली होती तरीही या मालिकेने आपला विशेष चाहतावर्ग निर्माण केला.

मात्र आता या मालिकेला आता प्रेक्षक कंटाळले आहेत, एकतर या मालिकेत स्त्री पुरुष समानते बद्दल नाहीच तर उलट यात याचा अपमानच केला आहे. अनिरुद्धने दुसरं लग्न केलं तर चालत. अरूंधतीच्या सासूलाही ते चालत. अरूंधतीचा आता घटस्फोट झाला तरीही तिची सासू तिच्यावर बंधनं घालते आहे. एक स्त्रीच स्त्रीच्या विरोधात आहे.

नातवाने काही केलं तर चालतं आणि नातसुनेन केलं तर नाही आणि कोणत्याही शुभ कार्यात हे काहीतरी विपरीत दाखवतात. आईच्या नावाने सुरु झालेल्या मालिकेत इतकी प्रेम प्रकरणे दाखवत आहेत. आता ही मालिका तुम्ही बंद करुन टाका असा संताप आता नेटकरी व्यक्त करत आहे.