
Urfi Javed: चित्रा वाघ शांत होताच आता 'याला' होतोय उर्फीच्या फॅशनचा प्रॉब्लेम...
गेल्या अनेक दिवसांपासून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ या दोघींमध्ये वाद होत आहे. उर्फी जावेदच्या फॅशनच्या विरोधात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आवाज उठवला .
उर्फी जावेदच्या चित्रविचित्र फॅशन स्टाइल त्यांना मान्य नव्हती उर्फी सार्वजनिक ठिकाणी अतरंगी कपडे परिधान करते, त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याचं चित्रा वाघ यांचं म्हणणं होत मात्र नुकतच त्यांनी कौतुक केलं कारण ती आता चांगल्या कपड्यांमध्ये दिसतेय. पण आता या मोनू देओरी याला उर्फीच्या फॅशनचा प्रॉब्लेम होतो आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
पण आता या मोनू देओरीला देखील उर्फीच्या फॅशनचा इतका प्रॉब्लेम होत आहे की या पठ्ठाने चक्क उर्फीला संदेशच दिला आहे. "तो म्हणतो की उर्फी दीदी आपल्या दुनियेत उडत आहे, पण मला तिची फॅशन नाही आवडत तर दीदी मुंबईच्या रस्त्यांवर अशी विचित्र फॅशन करून नको फिरूस, तुझ्याकडे कपडे घेण्यासाठी पैसे नसेल तर हा भाऊ आहे. माझ्या कडून पैसे घे. तुझा भाऊ असल्यामुळं मला खुप लाज वाटते."असं म्हणतं त्याने उर्फीला रोस्ट केलं आहे.
मोनू देओरी एक डान्सर, व्लॉगर आणि रिलस्टार आहे आणि अनेकदा मजेदार व्हिडिओ शेअर करते. त्याने याआधीही उर्फीची कॉपी करणारा हा मजेदार व्हिडिओ केला होता. . या व्हिडिओमध्ये मोनूने त्याचा ड्रेस म्हणून पाने बनवली आहेत.त्यात उर्फीप्रमाणे पोज देताना दिसत होता. मोनूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. इतकेच नव्हेतर याने मलायका अरोराचीही वाकडी स्टाइल करून व्हिडिओ केला होता.