अरुंधती अडकणार लग्नबंधनात?'आई कुठे काय करते' मालिकेला अनपेक्षित वळण..Madhurani Prabhulkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhurani Prabhulkar

अरुंधती अडकणार लग्नबंधनात?'आई कुठे काय करते' मालिकेला अनपेक्षित वळण..

'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kair karte) मालिका ही सध्याची केवळ स्टार प्रवाह या वाहिनीवरीलच नाही तर संपू्र्ण मराठी मालिका विश्वातील नंबर वनची मालिका आहे. या मालिकेचा प्रत्येक ट्रॅक हा जनमानसातील मनाचा ठाव घेऊनच जणू लिहिला जातो की काय असा भास वारंवार होत राहतो. कारण मालिकेच्या टीआरपी साठी नको ती अनपेक्षित वळणं या मालिकेत कधीच घेतली गेलेली दिसून आली नाही. मग अगदी मालिकेतल्या मुख्य अरुंधती(Arundhati) पात्राचं नवरा अनिरुद्दपासून वेगळं होणं,जगण्याची कसरत करणं,आयुष्यात पुन्हा आलेल्या जुन्या मित्राशी सहज वागणं हे इतकं लेखिकेनं सोपं मांडलं होतं की पाहताना ती अरुंधती आपल्यातलीच वाटली.

सध्या त्या मालिकेत अरुंधतीच्या मोठया मुलाचं अभिषेकचं लग्न होत आहे. आनंदी आनंद सुरू आहे जो नॉर्मली सर्वसामान्यांच्या घरात सध्या लग्नसोहळे जसे पार पडतात तसाच दाखवला जात आहे. उगाच कुठला तामझाम न दाखवता. पण आता मालिकेत अरुंधतीचं पात्र साकारणा-या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरनं(Madhurani Prabhulkar) मालिकेच्या सेटवरचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला अनं एकाच चर्चेला उधाण आलं. तर तो फोटो आहे अरुंधतीच्या हातावरील मेहेंदीचा. मेहेंदीत तिच्या हातावर A लिहिला आहे. आता A म्हटलं तर अरुंधती, A म्हटलं तर अनिरु्ध आणि A म्हटलं की आशुतोष ....आता अरुंधतीच्या हातावर A म्हणजे अनिरुद्धच्या नावाचा असं होणं कदापि शक्य नाही मग उरलं कोण आशुतोष अर्थातच. त्या फोटोवरून असे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा: कार्तिकचे फॅन्स आहात?त्याला भेटायची ही संधी सोडू नका;फक्त इतकच करा...

आता मधुराणीनं त्या फोटोला कॅप्शन दिलंय खरं की,'A म्हणजे Arundhati'...पण तरिही मालिकेच्या सेटवर मेहेंदी अनं हातावर A त्यामुळे अरुंधती-आशुतोष लग्न करतायत अशीच चर्चा होत आहे. आणि खरंतर अरुंधतीच्या आयुष्यात तिच्यावर मनापासून प्रेम करणारा,नव-यापेक्षाही अधिक एक मित्र म्हणून तिला समजून घेणारा एक जोडीदार आयुष्यात यावा अशी प्रेक्षकांचीही इच्छा आहेच. त्यामुळे आता मालिकेत अरुंधतीच्या लग्नाचं वळणही टीआरपीसाठी मदतच करेल खरंतर,तेव्हा लेखिकेनं या मुद्दयाचा विचार नक्कीच केला अनं हे अनपेक्षित वळण आणलं तर नवल न वाटावे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top