कार्तिकचे फॅन्स आहात?त्याला भेटायची ही संधी सोडू नका;फक्त इतकच करा....Kartik Aaryan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan

कार्तिकचे फॅन्स आहात?त्याला भेटायची ही संधी सोडू नका;फक्त इतकच करा...

कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) हा सध्याचा बॉलीिवूडमधला मोस्ट प्रॉमिसिंग नट वाटतो. लूक,अॅक्टिंग,डान्सिंग,फायटिंग या सगळयाच बाबतीत त्यानं केलेल्या भूमिकांमधनं तो उजवा ठरलाय. 'प्यार का पंचनामा' सिनेमातनं तीन हिरोंच्या गर्दीतही त्यानं आपल्या लूकनं आणि अभिनयानं बाजी मारून नेली. आणि मग काय ''सोनू के टीटू की स्वीटी','लव आज कल2','लुका छूपी','धमाका' अशा सिनेमातनं त्यानं दाखवून दिलं की तो एकटा सिनेमा लीड करू शकतो. करण जोहरनं आपल्या 'दोस्ताना 2' मधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवल्यावर खूप नकारात्मक बातम्यांना उधाण आलं होतं. पण कार्तिकनं नुकतच एका मुालाखतीतनं स्पष्ट केलं की मला या नकारात्मक गोष्टी लढण्याची ताकद देतात,पुढचा मार्ग शोधण्यासाठी हिम्मत देतात. मी या गोष्टींना घाबरत नाही.

कार्तिकचं फॅन फॉलॉइंग म्हणाल तर मुलींसोबत मुलंही त्या लिस्टमध्ये आहेत बरं का. याचं नुकतच एक ज्वलंत उदाहरण पहायला मिळालं. तर झालं असं की,मुंबईतल्या कार्तिक आर्यनच्या घरासमोर दोन मुली सकाळच्या सुमारास पोहोचल्या. अनं कार्तिकनं त्याच्या बालकनीत यावं आणि एक झलक दाखवावी म्हणून त्याच्या नावाचा जयघोष करून ओरडू लागल्या. आता त्याच्या इमारतीच्या वॉचमेनलाही काही सुचत नव्हतं,यांचं करू काय. इथून पिटाळून देऊ की नको अशा विचारात तो बिचारा दिसत होता. पण या दोन चाहत्या काही कार्तिकला बघितल्याशिवाय हटायला तयार नव्हत्या. शेवटी कार्तिक इमारतीच्या गेटजवळ येऊन त्यांना भेटलाच. इथे बातमीत वर आम्ही तो व्हिडीओ जोडत आहोत. सेलिब्रिटी कॅमेरामन विरल भयानीनं त्या कार्तिकच्या चाहत्यांनी घातलेला गोंधळ आपल्या कॅमे-यात बंदिस्त केलाय.

हेही वाचा: सोनाक्षीला जायचंय अज्ञातवासात;म्हणाली,'मला माणसांपासून लांब राहायचंय'

या व्हिडीओला शेअर करीत कार्तिकनं म्हटलंय,''मी या चाहत्यांच्या प्रेमासाठीच जगतोय. तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप प्रेम''. तर अनेक इतर चाहत्यांनी कार्तिकला आम्ही पण येऊ का भेटायला म्हणत चक्क येण्याची वेळही लिहीलीय कमेंट बॉक्समध्ये. कार्तिक आर्यन लवकरच 'भूलभूलैय्या 2','शहजादा' या सिनेमात दिसणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top