Aai Kuthe Kay Karte: अरुंधती, संजना नंतर आता अनिरुद्धची तिसरी इनिंग.. मालिकेत वीणाची एंट्री..

'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट..
Aai Kuthe Kay Karte serial latest update khushboo tawde entry as veena ashutosh sister
Aai Kuthe Kay Karte serial latest update khushboo tawde entry as veena ashutosh sister sakal

Aai Kuthe Kay Karte: स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' मालिका सध्या बरीच चर्चेत आहे. कारण अखेर अरुंधतीचं आशुतोष सोबत लग्न होऊन ती संसाराला लागली आहे. पण आई पाठोपाठच आता इशाचे ही लग्न होणार आहे. गेले काही दिवस मालिकेत इशाच्या साखरपुड्याचे वारे वाहू वाहत आहेत.

अशातच आता एक नवीन प्रोमो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये इशाचा साखरपुडा झालेला असतो आणि सर्वजन एकत्र बसलेले असतात. यावेळी अनिरुद्ध सर्वांना एक सरप्राइज देतो. ते सरप्राइज पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो.

अनिरुद्धने आता अशी खेळी केली आहे की, याचे परिणाम सर्वानाच भोगावे लागणार आहेत. नेमका काय आहे हा प्रकार ते पाहूया..

(Aai Kuthe Kay Karte serial latest update khushboo tawde entry as veena ashutosh sister)

झाले असे की, इशाच्या साखरपुड्या साठी सर्वजन एकत्र आलेले असतात. यावेळी अरुंधती आणि आशुतोष देखील देशमुखांच्या घरी आलेले असतात. अशातच अनिरुद्ध म्हणतो 'मी आज तुम्हाला एका खास व्यक्तीला भेटवणार आहे.. ' (aai kuthe kay karte)

'माझी नवीन बिजनेस वीणा पार्टनर तुम्हाला भेटायला आली आहे..' आणि वीणाची एंट्री होती. पुढे अनिरुद्ध म्हणतो, 'आणि वीणा ही आशुतोष ची बहीण आहे'.. हे ऐकून घरच्यांना मोठा धक्का बसतो. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत आशुतोषच्या बहिणीची चर्चा रंगली होती. अखेर तिची एंट्री अशा धमकेदार पद्धतीने झाली आहे.

अभिनेत्री खुशबू तावडे हे 'वीणा'च्या भूमिकेत दिसणार आहे. वीणाच्या येण्याने 'आई कुठे काय करते' मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. 

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आपल्या बहिणीला अशा पद्धतीने समोर आलेलं पाहून आशुतोष ही गोंधळतो. त्यावर अरुंधती म्हणते , 'आशुतोष, माझं मन मला सांगतंय.. अनिरुद्ध वीणाला हाताशी धरून घरामध्ये नक्कीच एखादं मोठं वादळ आणणार.. ' सध्या या व्हिडिओची बरीच चर्चा आहे.

आता वीणा नेमकी का आलीय, तिच्या येण्याने संजनाची काय भावना असणार आणि विशेष म्हणजे तिचे आणि अनिरुद्धचे संबंध कसे असतील हे पाहायला चाहते उत्सुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com