'आई कुठे काय करते' मालिकेवर पुरस्कारांचा वर्षाव | Aai Kuthe Kay Karte | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aai Kuthe Kay Karte Team

'आई कुठे काय करते' मालिकेवर पुरस्कारांचा वर्षाव

sakal_logo
By
स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte या लोकप्रिय मालिकेवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. या मालिकेला दादासाहेब फाळके आयकॉनिक अवॉर्ड फिल्म्समध्ये (DPIAF) २०२१ चार पुरस्कार मिळाले आहेत. मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांना मराठी टीव्हीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्याचे फोटो या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.

मालिकेत मधुराणी आणि मिलिंद यांच्यासोबतच अभिनेत्री रुपाली भोसलेची महत्त्वाची भूमिका आहे. खलनायिकेच्या भूमिकेसाठी रुपालीनेही पुरस्कार आपल्या नावे केला आहे. तर मराठी टेलिव्हिजनवरील सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून 'आई कुठे काय करते'ला पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार सोहळ्यातील या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा: 'ब्रेकअपनंतर मी असंख्य महिलांशी सेक्स केलं'; प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा

या मालिकेत आशुतोष कुलकर्णी या नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे. या नव्या पात्रामुळे अरुंधतीच्या आयुष्यात पुन्हा नवं वळण आलं आहे. एकीकडे अनिरुद्धकडून अरुंधती आणि आशुतोष यांच्या मैत्रीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे 'मला आता फक्त आणि फक्त मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. मला जे करून बरं वाटतं ते करायचं आहे,' असं अरुंधती कुटुंबीयांसमोर स्पष्ट करते.

loading image
go to top