'ब्रेकअपनंतर मी असंख्य महिलांशी सेक्स केलं'; प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Will Smith

'ब्रेकअपनंतर मी असंख्य महिलांशी सेक्स केलं'; प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता विल स्मिथचा Will Smith जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. पर्सुट ऑफ हॅपिनेस, मेन इन ब्लॅक यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार अभिनय केलं. विल स्मिथ सध्या त्याच्या आत्मचरित्रामुळे चर्चेत आला आहे. 'विल' या आत्मचरित्रात त्याने त्याच्या खासगी आयुष्याविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. पहिल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवला, असं त्याने त्यात म्हटलंय. यामुळे माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम झाल्याचं त्याने सांगितलं.

"प्रेमभंगाला काही औषध नसतं, पण त्यावेळी मला खरंच मानसिक शांतीची गरज होती. मी होमिओपॅथिक औषधांचा आधार घेतला. ब्रेकअपनंतर मी अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवू लागलो. माझ्या आयुष्यात जेव्हा मेलानी (गर्लफ्रेंड) होती, तेव्हा मी तिच्याशी एकनिष्ठ होतो. मात्र ब्रेकअपनंतर मला काही सुचेनासं झालं. मी बऱ्याच स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवलं. खरंतर ते माझ्या प्रामाणिक मनाला अजिबात पटणारं नव्हतं. या गोष्टींचा माझ्यावर खूप खोलवर परिणाम झाला. कधी कधी मी त्याशिवाय राहू शकत नव्हतो तर कधी कधी अक्षरश: मला उलटी यायची", असा खुलासा विल स्मिथने आत्मचरित्रात केला.

हेही वाचा: सलमानचा मेहुणा पुण्याच्या रस्त्यावर धावला ३३ किमी; जाणून घ्या कारण..

"ज्या ज्या महिलेसोबत मी शारीरिक संबंध ठेवले, त्या प्रत्येकीजवळ गेल्यावर मी हीच एक आशा करायचो की मला माझ्या ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर काढणारी, माझ्यावर नि:स्वार्थ प्रेम करणारी महिला हिच ठरू दे. मात्र नेहमी तेच होत गेलं आणि मी आणखी दु:खात बुडत गेलो", असं त्याने पुढे लिहिलं.

विल स्मिथने १९९२ मध्ये शीरी झम्पिनोशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आहे. मात्र १९९५ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. १९९७ मध्ये विलने जेडा पिंकेट स्मिथशी लग्न केलं. या दोघांना जॅडेन ख्रिस्तोफर सायर स्मिथ आणि विलो कॅमिल रेन स्मिथ ही दोन मुलं आहेत.

loading image
go to top