
Aakash Chopra Comment on Laal singh Chaddha बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सातत्याने चर्चा सुरू आहे. आधी चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे उत्तम रिव्ह्यू येत आहेत. दरम्यान, माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रानेही (Aakash Chopra) या चित्रपटाचे कौतुक केले आहे. मात्र, त्याला त्याची प्रशंसा करणे कठीण जात आहे.
माजी क्रिकेटर आकाश चोप्राने (Aakash Chopra) लाल सिंह चड्ढा चित्रपटाबद्दल ट्विट केले, ‘काल रात्री लाल सिंह चड्ढा हा चित्रपट पाहिले. आमिर खानने किती छान अभिनय केला आहे. त्याच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक. (लगान, गजनी, दंगल इतर चित्रपटांसह). चित्रपट तुमच्यासोबत पुढे जातो आणि तुम्ही लाल सिंगच्या प्रेमात पडता.’
आकाश चोप्राने लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचे कौतुक केले. यामुळे चाहते संतापले. ट्विटरवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. कोणीतरी लिहिले की, हे पेड रिव्यू (सशुल्क पुनरावलोकन) आहे का? म्हणजेच पैसे घेऊन चित्रपटाचे कौतुक झाले आहे. ज्यावर आकाश चोप्राने लिहिले की, ‘हे सशुल्क पुनरावलोकन नाही.’
यानंतर लोकांनी आकाश चोप्रावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केल्यानंतर काही लोकांनी आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनलचे (YouTube channel) सदस्यत्व रद्द करण्यास सुरुवात केली. एका यूजरने फोटो शेअर केल्यावर आकाश चोप्राने ‘बाय-बाय’ असे लिहिले. मी सर्व सदस्यांना महत्त्व देतो. परंतु, तुमच्या मताशी जुळणारे मत मी ठेवू शकत नाही. मी स्वतःला वेगळे ठेवतो.
आकाश चोप्रा हा मजेदार समालोचनासाठी (कॉमेंट्री) प्रसिद्ध आहे. त्याचे यूट्यूब चॅनल देखील हेडलाइन्समध्ये आहे. दुसरीकडे लाल सिंह चड्ढा या चित्रपटाबाबत बोलताना आमिर खानच्या (Aamir Khan) जुन्या वक्तव्याबाबत सोशल मीडियावर चित्रपटाविरोधात एक ट्रेंड चालवला जात होता आणि बहिष्काराची चर्चा होत होती. आमिर खान म्हणाला होता की, तो जबरदस्तीने कोणालाही चित्रपट पाहण्यास सांगू शकत नाही.