नऊ वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडी विभक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Ali and Sanjeeda Shaikh

नऊ वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडी विभक्त

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडी आमिर अली (Aamir Ali) आणि संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) यांचा घटस्फोट झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यावर आमिर किंवा संजीदाने कोणतंच वक्तव्य केलं नव्हतं. 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार या दोघांनी नऊ महिन्यांपूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आमिर आणि संजीदाला त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा झालेली आवडत नसल्याने त्यांनी घटस्फोटाविषयी अधिकृत माहिती माध्यमांना दिली नाही, असंदेखील सूत्रांनी म्हटलंय.

आमिर आणि संजीदा यांना आर्या ही दोन वर्षांची मुलगी आहे. मुलीचा ताबा संजीदाला मिळाला असून ती आईसोबत राहत असल्याचं कळतंय. आमिर आणि संजीदाशी संपर्क केला असता दोघांनीही घटस्फोटाचं वृत्त फेटाळलं नाही आणि त्याबद्दल माहितीही दिली नाही.

आमिर आणि संजीदाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी काही वर्षे ही दोघं एकमेकांना डेट करत होते. २०२० पासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खटके उडत असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर आमिर आणि संजीदा वेगळे राहू लागले. संजीदा ही टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'क्या होगा निम्मो का' या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. तर 'बागबान' या चित्रपटात तिने काम केलं होतं. 'नच बलिये ३' या डान्सिंग शोमध्ये आमिर आणि संजीदाने भाग घेतला होता. या दोघांनी ही ट्रॉफी जिंकली होती.

हेही वाचा: "..म्हणून सलमानशी ब्रेकअप केलं"; अखेर अभिनेत्रीने केला खुलासा

दुसरीकडे आमिरने जाहिरातींमधून करिअरची सुरुवात केली. त्याने 'आय हेट लव्ह स्टोरीज', 'राख', 'अंजान', 'ये क्या हो रहा है' यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. काही म्युझिक व्हिडीओमध्येही तो झळकला. 'कहानी घर घर की' या प्रसिद्ध मालिकेत त्याने समीर कौलची भूमिका साकारली होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainment
loading image
go to top