"..म्हणून सलमानशी ब्रेकअप केलं"; अखेर अभिनेत्रीने केला खुलासा | Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salman khan

"..म्हणून सलमानशी ब्रेकअप केलं"; अखेर अभिनेत्रीने केला खुलासा

अभिनेता सलमान खानचं (Salman Khan) नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. त्यातीलच एक नाव म्हणजे सोमी अली (Somy Ali). नव्वदच्या दशकात सलमानने सोमीला डेट केल्याचं म्हटलं जातं. मात्र ब्रेकअपनंतर ती अमेरिकेला राहायला गेली. १९९१ ते १९९९ यादरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोमीने सलमानसोबतच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं. त्याचप्रमाणे त्याच्या आईवडिलांचं कौतुक करत त्यांच्याकडून शिकायला मिळालेल्या गोष्टींबद्दल ती व्यक्त झाली.

'फ्री प्रेस जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत सोमी म्हणाली, "मी त्याच्या आईवडिलांकडून खूप काही शिकले. सलमानकडूनही मला खूप काही शिकायला मिळालं. शेवटी, कोणत्याही नात्यात जर तुम्ही आनंदी नसाल, तर वेगळं होणंच चांगलं. सलमान आणि माझ्याबाबतीत हेच घडलं. त्यामुळे मी अमेरिकेला परत जाण्याचा निर्णय घेतला."

"मी त्याच्या पालकांकडून जे शिकलो ते खूप अभूतपूर्व आहे. त्यांचं घर सर्वांसाठी खुलं होतं. दररोज लोक ये-जा करत असत. ते प्रेमाने त्यांना खायला घालायचे. त्यांच्या दाराला कधीच कुलूप नव्हतं. आणखी एक महत्त्वाचा धडा मी शिकले ते म्हणजे आपण सगळे सारखेच आहोत. त्यांनी अजिबात कधी भेदभाव केला नाही. त्यांना धर्मात कधीच फरक दिसला नाही. त्यांच्याकडून ही गोष्ट शिकणं खूप महत्वाचं आहे," असं ती पुढे म्हणाली.

हेही वाचा: 'बिग बॉस मराठी'चा चौथा सिझन 'या' महिन्यात होणार लाँच?

सोमीने सलमानचंही कौतुक केलं. बिईंग ह्युमन फाऊंडेशनच्या माध्यमातून तो करत असलेल्या परोपकारी कार्याबद्दलही तिने त्याचं कौतुक केलं. वयाच्या १७व्या वर्षापासून सलमानला डेट करत असल्याचं सोमीने या मुलाखतीत सांगितलं. 'मैने प्यार किया' हा चित्रपट पाहिल्यानंतर सोमी सलमानच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी ती भारतात आली. सोमीने तिच्या भावना व्यक्त केल्याच्या वर्षभरानंतर हे दोघं एकमेकांना डेट करू लागले होते.

सोमीने सलमानसोबत एका चित्रपटाचं शूटिंगदेखील केलं होतं. मात्र ते अखेर रद्द करण्यात आलं होतं. सोमीने मिथुन चक्रवर्तीसोबत कृष्ण अवतार, सैफ अली खानसोबत यार गद्दार आणि सुनील शेट्टीसोबत अंत यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :salman khan
loading image
go to top