esakal | आमिर खान-किरण रावचा घटस्फोट; १५ वर्षांच्या संसारानंतर विभक्त
sakal

बोलून बातमी शोधा

आमिर खान-किरण रावचा घटस्फोट; १५ वर्षांच्या संसारानंतर विभक्त

आमिर खान-किरण रावचा घटस्फोट; १५ वर्षांच्या संसारानंतर विभक्त

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. १५ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 'या सुंदर १५ वर्षांमध्ये आम्ही आयुष्यभराचा आनंद, हास्य यांचा अनुभव घेतला आणि त्यातून या नात्यात एकमेकांविषयी आदर, प्रेम आणि विश्वास वाढला. आता आम्हाला आमच्या आयुष्यातील एक नवीन प्रवास सुरू करायला आहे. पण पती-पत्नी म्हणून नाही तर पालक आणि एकमेकांचे कुटुंब म्हणून', असं आमिर आणि किरणने स्पष्ट केलंय.

'विभक्त होण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती आणि आता आम्ही दोघं वेगवेगळे राहत आहोत. मुलगा आझादचं संगोपन आम्ही दोघं मिळून करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्ट्सवर सोबत काम करणार आहोत. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींचे खूप आभार, कारण त्यांनी या निर्णयात आमची साथ दिली आणि आम्हाला समजून घेतलं. आमच्या हितचिंतकांनीही शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला द्याव्यात. घटस्फोट म्हणजे शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे', असं त्यांनी पुढे म्हटलं.

हेही वाचा: Shruti Haasan : 'बरं झालं आईबाबांनी घटस्फोट घेतला'

आमिर आणि किरणने २००५ साली लग्न केलं होतं. 'लगान' या चित्रपटासाठी किरणने सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं होतं. २०११ साली किरणने सरोगसीच्या आधारे मुलाला जन्म दिला. या दोघांना नऊ वर्षांचा आझाद हा मुलगा आहे. त्याआधी आमिरने १९८६ मध्ये अभिनेत्री रिना दत्ताशी लग्न केलं होतं. या दोघांना जुनैद हा मुलगा आणि आयरा ही मुलगी आहे. २००२ साली या दोघांनी घटस्फोट घेतला आणि त्यानंतर दोन्ही मुलांचा ताबा रिना दत्ताला मिळाला.

loading image