मुलगी इराच्या लाईव्ह वर्कआऊटदरम्यान मध्येच धडकला आमीर आणि मग..

टीम ई सकाळ
बुधवार, 1 जुलै 2020

आमीरची मुलगी देखील फिटनेसच्या बाबतीत सतर्क असते. नुकतचं इराचं लाईव्ह वर्कआऊट सुरु असताना या व्हिडिओमध्ये आमीरची एंट्री पाहायला मिळाली.

मुंबई- बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता म्हणून आमीर खानकडे पाहिलं जातं. दंगल, गजनी सारख्या सिनेमांमध्ये त्याचं फॅट टू फिट हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं गेलं आहे. त्याच्या भूमिकेसाठी तो जीवापाड मेहनत करतो. आमीरची मुलगी देखील फिटनेसच्या बाबतीत सतर्क असते. नुकतचं इराचं लाईव्ह वर्कआऊट सुरु असताना या व्हिडिओमध्ये आमीरची एंट्री पाहायला मिळाली.

हे ही वाचा: सुशांतने एका महिन्यात का बदलले ५० सिमकार्ड? शेखर सुमन यांचा सवाल

लॉकडाऊनमध्ये सेलिब्रिटी जीमला जाऊ शकत नसल्याने घरीत वर्कआऊट करत आहेत. घरातून ट्रेनरकडून ऑनलाईन लाईव्ह वर्कआऊट करताना दिसत आहेत. आमीर खानची मुलगी इराने नुकतीच इंस्टाग्रामवर लाईव्ह जीम सेशनला हजेरी लावली होती. याच दरम्यान तिचे वडिल आमीर खान मध्येच व्हिडिओमध्ये दिसून आले. इरा फिटनेस ट्रेनर डेविड पॉॉजनिकसोबत सेशन करत होती.

डेविडने 'धूम ३' आणि 'पीके' सारख्या सिनेमांत आमीरला ट्रेनिंग दिली आहे.इराच्या ट्रेनिंग दरम्यान आमीर मध्येच येऊन डेविडला हाय करतो. तेव्हा डेविड आमीरलाही व्यायाम करायला सांगतो. आमीर यावर उत्तर देत म्हणतो की तो आत्ता करु शकत नाही. तेव्हा आमीरची मुलगी इरा म्हणते, 'पुढच्या वेळी  ते करतील, मी त्यांच्याकडून जबरदस्तीने करुन घेईन.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Join us for a fun home workout with Ira Khan during 

A post shared by Poznic Training (@poznictraining) on

डेविडने त्याच्या इंस्टाग्रामवर पूर्ण वर्कआऊट सेशन पोस्ट केलं आहे. सोबतंच लिहिलंय, 'आमीरला 'धूम ३' आणि 'पीके' दरम्यान ट्रेनिंग देत होतो तेव्हा इरा त्याच्या अवतीभोवती असायची मात्र व्यायाम करायला सांगितल्यावर पळून जायची. एवढी वर्ष सरली आता आम्ही दर आठवड्याला व्यायाम करतो. मात्र आता उलट झालं आहे इरा वर्कआऊट करतेय आणि आमिर हा बोलून निघून गेला आहे.'  

aamir khan appears in daughter ira khan live workout session with david poznic  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aamir khan appears in daughter ira khan live workout session with david poznic