Aamir Khan : आमिर खान मुंबई सोडणार, कोणत्या शहरात असणार मुक्काम?

आता आमिरनं एक मोठा निर्णय घेतल्याचे दिसून आले आहे. तो काही कारणानिमित्तानं मुंबई सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Aamir Khan Bollywood Actor Left Mumbai Shifted
Aamir Khan Bollywood Actor Left Mumbai Shiftedesakal
Updated on

Aamir Khan bollywood Actor Left Mumbai Shifted : बॉलीवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. तो नेहमीच त्याच्या प्रयोगशीलतेसाठी चर्चेत असतो. त्याची प्रयोगशीलता मात्र लाल सिंग चढ्ढाबाबत फसल्याचे लक्षात आले. त्यामुळे आमिरला मोठा तोटा सहन करावा लागला होता.

आता आमिरनं एक मोठा निर्णय घेतल्याचे दिसून आले आहे. तो काही कारणानिमित्तानं मुंबई सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आमिरविषयी वेगवेगळ्या बातम्याही समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी आमिरनं त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. सितारे जमीन पर असे त्याच्या आगामी प्रोजेक्टचे नाव आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया आणि फातिमा सना शेख दिसणार आहे.

आमिर मुंबईला अलविदा करणार असल्याचे कळताच त्याच्या चाहत्यांना वाईट वाटले आहे. या सगळ्यात आमिरकडून याविषयी कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र तो महिन्यांसाठी चैन्नईला जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचे कारण आमिरची आई जीनत हुसैन आहे अशीही चर्चा आहे.

आमिरची आई यांच्या प्रकृतीशी संबंधित कारण सध्या समोर येत आहे. चैन्नईमध्ये त्या सध्या उपचार घेत असल्याची माहिती असून त्यासाठी आमिर खान हा दोन महिने मुंबईमध्ये नसल्याचे सांगण्यात येते. आमिरनं चैन्नईमध्ये काही दिवस राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा वेळ आपल्या कुटूंबासाठी द्यावा असा विचार आमिरनं केला आहे.

Aamir Khan Bollywood Actor Left Mumbai Shifted
Ganapath Movie Review : टायगरच्या माकडउड्यांचा 'फुसका गणपत', आजारी पडलेली कथा अन् बरचं काही!

२०२२ मध्ये आलेल्या लाल सिंग चढ्ढानंतर आमिरनं काही दिवस ब्रेक घेतला होता. मात्र आता तो त्याच्या आगामी सितारे जमीन पर नावाच्या चित्रपटातून समोर येणार आहे. त्याचे दिग्दर्शन अद्वैत चंदन हे करणार असल्याची माहिती आहे.

Aamir Khan Bollywood Actor Left Mumbai Shifted
Leo Twitter Review: काहींना आवडला तर काहींची नाराजी, विजयचा लिओ सिनेमा कसा आहे? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com