Bigg Boss मध्ये दिसणार आमिर खानचा भाऊ फैसल, अनेक गुपितं होणार उघड? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan Brother Faisal Khan

Bigg Boss मध्ये दिसणार आमिर खानचा भाऊ फैसल, अनेक गुपितं होणार उघड?

Aamir Khan Brother Faisal Khan Participate In Bigg Boss 16 : अभिनेता आमिर खानला तुम्ही चंदेरी पडद्यावरील लालसिंग चड्ढामध्ये पाहिले असेल. मग आता त्याचा भाऊ फैसल खानलाही (Faisal Khan) पडद्यावर पाहण्याची इच्छा असेल ना? ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण फैसल खान सर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बाॅस १६ मध्ये (Bigg Boss 16) सहभागी होण्याचे वृत्त आहेत.

हेही वाचा: Brahmastra : इतिहास घडवण्यासाठी 'ब्रह्मास्त्र' सज्ज, कमाईबाबत तज्ज्ञ आशावादी

फैसल खान बिगमध्ये दिसणार का?

मात्र कोणत्याही निर्णयावर येण्यापूर्वी व जास्त उत्साहित होण्यापूर्वी अगोदर स्वतः फैसल खानची प्रतिक्रिया तर जाणून घ्या. सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे की आमिर खानचा (Aamir Khan) भाऊ बिग बाॅस १६ मध्ये दिसेल. यामुळे चाहते खूश झाले होते.

मात्र आता स्वतः फैसल पुढे येऊन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला, या बातम्यांमध्ये खरे काही नाही. फैसलने ही ऑफर नाकारली आहे. त्याच्याशी बिग बाॅस १६ साठी निर्माते बोलल्याचे त्याने सांगितले होते.

हेही वाचा: अभिनेत्याच्या कुटुंबाच कर्ज फिटलं, अभिनेत्रीने संकटाच्या काळात दिली साथ

टीव्ही शोची ऑफर

फैसल म्हणाला, त्याला एका टीव्ही शोची ऑफर आली आहे. मात्र त्याने शो कोणता आहे, त्यात तो असणार की नाही, याबाबत काही सांगितलेले नाही. बिग बाॅसमध्ये सामील होण्याबाबत फैसलने इन्स्टावर व्हिडिओ शेअर केला. त्यात तो म्हणाला, मी बिग बाॅसची ऑफर नाकारली आहे. दुसऱ्या एका टीव्ही शोची ऑफर मिळाली आहे. मी या गोष्टींनी खूप खूश आहे, की लोक मला त्यांच्या प्रोजेक्टमध्ये घेऊ इच्छित आहेत.

Web Title: Aamir Khan Brother Faisal Khan Participate In Bigg Boss 16 Actor Give Clearification

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..