esakal | 'वयात आल्यावर आईनंच दिलं SEX EDUCATION चे पुस्तक'
sakal

बोलून बातमी शोधा

ira khan

'वयात आल्यावर आईनंच दिलं 'SEX EDUCATION' चे पुस्तक'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान (amir khan) त्याच्या वेगळेपणासाठी सर्वांना परिचित आहे. गेल्या काही दिवसांपासून तो चर्चेत आहे. ते त्याच्या दुसऱ्या घटस्फोटासाठी. दरम्यानच्या काळात त्याची मुलगी आयरा (ira khan) खानही सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असते. आमीरच्या नावाची जेवढी चर्चा असते, तेवढीच आयराच्याही नावाची असते. काही दिवसांपूर्वी ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर दिसली होती. आयरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिच्या एका पोस्टमुळे. त्या पोस्टमध्ये तिनं वेगळा खुलासा केला आहे. (aamir khan daughter ira khan reveals mother reena dutta gave sex education book yst88)

आयराच्या आईनं म्हणजे रिना दत्तनं तिला जेव्हा ती वयात आली तेव्हा सेक्स एज्युकेशनचे पुस्तक दिलं. असा खुलासा केला आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.एक भेट म्हणून तिनं हे पुस्तक दिलं होतं. असं आयरानं सांगितलं आहे. आगस्तु फाउंडेशनच्या वतीनं पिंकी प्रॉमिस टू मी नावाच्या एका सीरिजच्या अंतर्गत आयरानं आपल्या शरिराविषयीच्या एका भागावर बोलत आहे.

आयरानं सोशल मीडियावर ती स्टोरी शेयर केली आहे. त्यात तिनं लिहिलं आहे की, मला असे वाटत नाही की, मी स्वताला एवढं बारकाईनं निरखून पाहिलं आहे ते, मी जेव्हा वयात आले. तरुण झाले तेव्हा मला माझ्या आईनं सेक्स एज्युकेशन नावाचे पुस्तक दिले होते. जेणेकरुन मला काही गोष्टींची माहिती व्हावी. मनातील गैरसमज दूर व्हावेत. हा त्यामागील उद्देश होता. त्या पुस्तकामध्ये असे लिहिले होते की, तु आता स्वताला डोक्यापासून पायापर्यत व्यवस्थित निरखलं पाहिजे. माझं शरीर तेव्हा बदललं होतं. आणि अजून खूप मोठा प्रवास करायचा होता. त्या प्रवासात हे पुस्तक मदतीला आलं.

हेही वाचा: नवऱ्यानंतर बायकोही अडचणीत, शिल्पा शेट्टीच्या घरी क्राईम ब्रँचचा छापा

हेही वाचा: शाहिदच्या 'मीराचा' नवीन लूक, ओठ पाहून चाहते 'हँग'

जेव्हा आमिर खानचा घटस्फोट झाला तेव्हा त्याची मुलगी आयरा चर्चेत आली होती. याशिवाय तिनं आपल्या खासगी आयुष्यातील वेगवेगळ्या घडामोडींचा खुलासा केला होता. आयरा गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. ती तिच्या बॉयफ्रेंडमुळे अनेकदा ट्रोल होत असल्याचेही दिसून आले आहे.

loading image
go to top