आमिर खानचा मोठा निर्णय; 'या' कारणामुळे वापरणार नाही मोबाइल फोन

आमिर खानचा मोठा निर्णय; 'या' कारणामुळे वापरणार नाही मोबाइल फोन

मुंबईः करिअरमधला प्रत्येक प्रोजेक्ट आणि प्रत्येक चित्रपट सर्वोत्तम बनावा यासाठी अभिनेता आमिर खान सतत प्रयत्नशील असतो. म्हणूनच त्याला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' असं नाव देण्यात आलं आहे. आपल्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाचं काम व्यवस्थित पूर्ण व्हावं, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करता यावं यासाठी आता आमिरने एक मोठा निर्णय घेतला आहे. आमिरने 'कम्युनिकेशन डिटॉक्स'चा पर्याय निवडला असून तो आता मोबाइलचा वापर पूर्णपणे टाळणार आहे. 

आमिरने सध्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या शूटिंगमधून ब्रेक घेतला असून तो एका मित्राच्या दिग्दर्शकीय पदार्पणासाठी मदत करत आहे. अमिन हाजीच्या 'कोई जाने ना' या चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची शूटिंग जयपूरमध्ये पार पडल्यानंतर आमिर मुंबईला परतला आहे. लवकरच तो 'लाल सिंग चड्ढा'च्या पोस्ट-प्रॉडक्शनच्या कामाला सुरुवात करणार आहे. याच कामात कोणताही व्यत्यत येऊ नये आणि पूर्ण लक्ष केंद्रित करता यावं यासाठी त्याने मोबाइलचा वापर पूर्णपणे टाळला आहे. आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 

वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यावर पूर्णपणे लक्ष देण्यासाठी आमिरने मोबाइल न वापरण्याचा निर्णय घेतल्याचं त्याच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलंय. "आपण मोबाइल फोनच्या अधीन गेलो असून त्याचा वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर परिणाम होत असल्याचं आमिरला वाटतंय. त्यामुळे त्याने सोमवारपासून मोबाइल फोन अजिबात न वापरण्याचा निर्णय घेतला आहे", असं त्यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितलं. 

आमिरशी संपर्क साधायचे असल्यास त्याच्या मॅनेजरशी संपर्क साधावा अशी सूचना त्याने आधीच त्याच्या निकटवर्तीयांना दिली आहे. इतकंच नव्हे तर 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आमिरचे सोशल मीडिया अकाऊंट्ससुद्धा मॅनेजरकडून सांभाळण्यात येणार आहेत.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Aamir Khan decides to turn off his phone completely

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com