Virat- Anushka Baby Name: जाणून घ्या विरुष्काच्या मुलीच्या नावाचा अर्थ

स्वाती वेमुल
Monday, 1 February 2021

अनुष्काने तिच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत मुलीचं नावसुद्धा जाहीर केलं आहे.

मुंबई: सेलिब्रिटी विश्वात सर्वांत चर्चेत असलेली जोडी क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी 11 जानेवारी रोजी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. विरुष्का त्यांच्या मुलीचं नाव काय ठेवणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती आणि त्याविषयी अनेक तर्क-वितर्कसुद्धा लावले जात होते. नुकतंच अनुष्काने तिच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत मुलीचं नावसुद्धा जाहीर केलं आहे. विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलीचं नाव वामिका असं ठेवलं आहे. 

अनुष्काने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये वामिकाला विराट आणि अनुष्का दोघंही प्रेमाने न्याहाळताना पाहायला मिळत आहेत. मात्र या फोटोमध्ये त्यांच्या मुलीचा चेहरा पाहायला मिळत नाही. 'आम्ही आतापर्यंत एकत्र प्रेमाने, कृतज्ञतेने जगलो, पण या चिमुकल्या वामिकाने आम्हाला एका नव्या विश्वाची ओळख करून दिली आहे. अश्रू, आनंद, हास्य, काळजी अशा अनेक भावना मी काही मिनिटांत अनुभवल्या आहेत. सध्या झोप तर पूर्ण होत नाही पण हृदय प्रेमाने गच्च भरलंय. शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार,' अशा शब्दांत अनुष्काने भावना व्यक्त केल्या. अनुष्काच्या या पोस्टवर सर्वसामान्य नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

वामिका या नावाचा अर्थ

विरुष्काच्या मुलीसाठी वामिका या नावाची चर्चा आधीपासूनच सोशल मीडियावर होती. वामिका हे देवी दुर्गेचं एक नाव आहे. 

11 डिसेंबर 2017 रोजी विराट-अनुष्काने इटलीत लग्नगाठ बांधली. तर 11 जानेवारी रोजी या सेलिब्रिटी कपलच्या घरात चिमुकल्या पाहुणीने जन्म घेतला.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Virat Kohli Anushka Sharma introduce daughter Vamika with her cute photo


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli Anushka Sharma introduce daughter Vamika with her cute photo