esakal | 'राजा हिंदुस्तानी'मधल्या किसिंग सीनमागची गोष्ट; २४ वर्षांनंतर दिग्दर्शकाने सांगितला किस्सा
sakal

बोलून बातमी शोधा

raja hindustani

नव्वदच्या दशकात हा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट तर १९९६ या वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

'राजा हिंदुस्तानी'मधल्या किसिंग सीनमागची गोष्ट; २४ वर्षांनंतर दिग्दर्शकाने सांगितला किस्सा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

'राजा हिंदुस्तानी' हा आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा चित्रपट ठरला. यामधील गाणी आणि संवाद आजही अनेक प्रेक्षकांना तोंडपाठ असतील. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आणखी एका कारणामुळे तुफान गाजला. तो म्हणजे यामधील आमिर-करिश्माचा किसिंग सीन. या दृश्यावर त्यावेळी वादही निर्माण झाला होता. चित्रपट प्रदर्शनाच्या २४ वर्षांनंतर याचे दिग्दर्शक धर्मेश यांनी या किसिंग सीनमागचा एक रंजक किस्सा सांगितला. 

'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत धर्मेश यांनी या सीनच्या पडद्यामागील घटना उलगडून सांगितल्या. "राजा हिंदुस्तानी चित्रपटाच्या आधी कोणत्याच चित्रपटात इतका मोठा किसिंग सीन चित्रीत झाला नव्हता. हा जेव्हा प्रेक्षक मोठ्या पडद्यावर पाहतील, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असेल याबाबत आम्ही साशंक होतोच. मूळ सीन जवळपास तीन मिनिटांपर्यंतचा शूट केला होता. हा सीन सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकणार याची आम्हाला खात्री होती. पण चक्क त्यांनीसुद्धा पूर्ण सीन ठेवण्यास परवानगी दिली. अखेर एडिटिंग टीमसोबत विचार-विनिमय करून तीन मिनिटांपैकी दोन मिनिटं ४० सेकंद कट करण्यात आला आणि केवळ २० सेकंदाचं किसिंग सीन चित्रपटात दाखवण्यात आलं. आता आम्हाला त्या सीनचं काहीच अप्रूप वाटत नाही, पण त्यावेळी फक्त तो सीन पाहण्यासाठी प्रेक्षक दोन ते तीन वेळा तिकिट खरेदी करून चित्रपटगृहात यायचे", असं त्यांनी सांगितलं. 

हेही वाचा : अनुष्काच्या वामिकासाठी सेलिब्रिटींनी पाठवले 'हे' महागडे गिफ्ट्स

हेही वाचा : या चिमुकल्याला ओळखलंत का? माधुरी दीक्षितशी आहे खास कनेक्शन

नव्वदच्या दशकात हा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट तर १९९६ या वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. एक श्रीमंत मुलगी आणि छोट्या शहरातील एक टॅक्सी ड्राइव्हर यांच्यातील प्रेमकहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली होती. आमिर आणि करिश्माच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून जबरदस्त दाद मिळाली होती आणि त्यातील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. 
 

loading image