esakal | Video: घटस्फोटानंतरही 'ऑल इज वेल', आमिर-किरणचा डान्स व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

aamir kiran

Video: घटस्फोटानंतरही 'ऑल इज वेल', आमिर-किरणचा डान्स व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

१५ वर्षांच्या संसारानंतर अभिनेता आमिर खान Aamir Khan आणि किरण रावने Kiran Rao घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाने आमिरच्या चाहत्यांना धक्का बसला. मात्र घटस्फोटानंतरही या दोघांमध्ये 'ऑल इज वेल' असल्याचं पहायला मिळत आहे. 'लाल सिंग चड्ढा' Laal Singh Chaddha या आमिरच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लडाखमध्ये सेटवर आमिर आणि किरण मनसोक्त नाचताना दिसत आहेत. 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान, मोना सिंग आणि नाग चैतन्य यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'फॉरेस्ट गम्प' या इंग्रजी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असून अद्वैत चंदनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. (Aamir Khan Kiran Rao dance together on Laal Singh Chaddha sets days after announcing divorce slv92)

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये आमिर आणि किरण लाल रंगाच्या पारंपरिक वेशभूषेत पहायला मिळत आहेत. एका महिलेच्या मार्गदर्शनानुसार हे दोघं डान्स करत आहेत. 'घटस्फोट जरी घेत असलो तरी चित्रपट आणि पानी फाऊंडेशनसाठी आम्ही एकत्र काम करत राहू. ज्या व्यावसायिक गोष्टींवर आम्हा दोघांचं प्रेम आहे, त्यासाठी एकत्र काम करत राहू', असं आमिरने स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा: लिएंडर-किम शर्माच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धनची प्रतिक्रिया

घटस्फोटाबाबत आमिरने काय म्हटलं होतं?

'विभक्त होण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती आणि आता आम्ही दोघं वेगवेगळे राहत आहोत. मुलगा आझादचं संगोपन आम्ही दोघं मिळून करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्ट्सवर सोबत काम करणार आहोत. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींचे खूप आभार, कारण त्यांनी या निर्णयात आमची साथ दिली आणि आम्हाला समजून घेतलं. आमच्या हितचिंतकांनीही शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला द्याव्यात. घटस्फोट म्हणजे शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे', असं आमिरने म्हटलं होतं.

loading image