esakal | लिएंडर-किम शर्माच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धनची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

लिएंडर-किम शर्माच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धनची प्रतिक्रिया

लिएंडर-किम शर्माच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धनची प्रतिक्रिया

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'मोहब्बतें' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री किम शर्मा Kim Sharma तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी किम ही अभिनेता हर्षवर्धन राणेला Harshvardhan Rane डेट करत होती. या दोघांचे एकत्र फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता किम ही टेनिसपटू लिएंडर पेसला Leander Paes डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. या दोघांचे गोव्यात एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. किम शर्माचा एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धनने त्यांच्या रिलेशनशिपवर प्रतिक्रिया दिली आहे. (Harshvardhan Rane reaction on ex Kim Sharma and Leander Paes relationship slv92)

काय म्हणाला हर्षवर्धन राणे?

"त्या दोघांबद्दल मला काहीच माहित नाही. ते दोघं खरंच एकमेकांना डेट करत असतील तर ही सर्वांत हॉट जोडी असेल", अशी प्रतिक्रिया हर्षवर्धनने दिली. गोव्यामधील एका रेस्टॉरंटने सोशल मीडियावर किम आणि लिएंडरचे फोटो पोस्ट केले होते. २०१८ मध्ये हर्षवर्धनने रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. "माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही. होय, मी रिलेशनशिपमध्ये आहे पण ती खासगी गोष्ट आहे. मला खासगी गोष्टी या खासगीच ठेवायला आवडतात", असं त्याने म्हटलं होतं.

हेही वाचा: लिएंडर पेस युवराज सिंगच्या एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात?

याआधीसुद्धा लिएंडर आणि किम यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गेल्या महिन्यात पापाराझींनी या दोघांना वांद्रयामध्ये एकत्र असताना गाठले होते. आता दोघे पहिल्यांदाच एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. हर्षवर्धन राणेच्या आधी किम शर्मा ही क्रिकेटर युवराज सिंगला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं.

loading image