आमिर खानच्या मराठी शिक्षकांचं निधन, म्हणाला 'तुमच्यासोबत घालवलेली ती ४ वर्ष...'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 3 September 2020

अभिनेता आमिर खानने सोशल मिडियावर त्याचे मराठीचे गुरु सुहास लिमये यांच्या निधनाची माहिती देत दुःख व्यक्त केलं आहे.

मुंबई- अभिनेता आमिर खानने सोशल मिडियावर त्याचे मराठीचे गुरु सुहास लिमये यांच्या निधनाची माहिती देत दुःख व्यक्त केलं आहे. सुहास लिमये सर यांचं आज मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये निधन झालं. सुहास सर अनेक दिवसांपासून हृदयाच्या आजाराने त्रस्त होते. या वाढत्या आजारामुळे आज त्यांचं निधन झालं. 

हे ही वाचा:  सुशांतची हत्या नसून आत्महत्याच ! शेकडो तासांच्या तपासानंतर सीबीआयचा निष्कर्ष  

आमिर खानने सोशल मिडियावर दुःख व्यक्त करत म्हटलं आहे, 'जशी मला तुमच्या निधनाची बातमी मिळाली मी आतुन पूर्णपणे हललो. कारण तुम्ही माझे सगळ्यात उत्तम शिक्षक होतात. तुमच्यासोबत घालवलेली ती ४ वर्ष खूप मोलाची आहेत. मला जराही विश्वास बसत नाहीये की तुम्ही आमच्यात नाही आहात. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे. तुमची विचार करण्याची पद्धत, एखाद्या गोष्टीची असलेली उत्सुकता, आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड इतरांपेक्षा खूप वेगळी होती. तुम्ही केवळ मला मराठीच नाही तर इतर अनेक गोष्टी शिकवल्या ज्या मला आजही कामी येत आहेत.' 

आमिरने शेवटी लिहिलं आहे की तो नेहमीच त्याच्या मराठीच्या गुरुंना मिस करेल. सुहास लिमये मराठी आणि संस्कृतचे जाणकार होते. आमीरने त्यांच्याकडून खास मराठीचं शिक्षण घेतलं होतं. आमिर सध्या तुर्कीमध्ये त्याच्या 'लाल सिंह चढ्ढा' या आगामी सिनेमाचं शूटींग करण्यात व्यस्त आहे.   

aamir khan mourned the death of his marathi teacher and penned down an emotional note for mr suhas limaye  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aamir khan mourned the death of his marathi teacher and penned down an emotional note for mr suhas limaye