सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून आत्महत्याच ?

sushant
sushant

मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरण गेल्या दोन महिन्यांपासून मिडियामध्ये गाजत आहे. सुशांतची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा सूर या प्रकरणात अनेकांनी लावला होता. मुंबई पोलीस, उत्तप्रदेश पोलीस यांच्या तपासानंतर यात सीबीआय तपासाची मागणी जोर धरु लागली होती. अखेर सुप्रीम कोर्टाने सीबीआय तपासाला होकार दिल्यानंतर गेले १३ दिवस सीबीआयचं पथक वेगवेगळ्या अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, संशयित, प्रत्यक्ष साक्षीदार, सुशांतच्या मृत्युशी संबधित अनेक व्यक्तींची कित्येक तास चौकशी करण्यात आली. मात्र या सगळ्यानंतरही आता सीबीआय एका महत्वाच्या निष्कर्षावर येऊन ठेपली आहे. 

सुशांतच्या केसमध्ये सीबीआयसोबतंच आर्थिक गैरव्यवहारमुळे ईडी तर ड्रग्स संबंधित खुलासे झाल्याने एनसीबी या दोन तपास यंत्रणांची देखील यात एंट्री झाली. सगळ्या दिशेने तपास केल्यानंतर सीबीआयला हत्येचा कोणताही ठोस पुरावा आत्तापर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे आता या प्रकरणात सगळ्यात महत्वाची घडामोड होणार आहे. एका वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतची हत्या झाली असल्याचं कुठेही निदर्शनास आलेलं नाही तेव्हा ही आत्महत्याच असल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे. मात्र सुशांतने नेमकी मानसिक छळ, आर्थिक कारण की उत्तेजक द्रव्याच्या व्यसनामुळे आत्नहत्येचं पाऊल उचललं याबाबत दोन दिवसात निष्कर्ष केला जाणार असल्याचं सांगितलं आहे. 

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचे कुटुंबिय, मॅनेजर, सीए, नोकर, वॉचमन यांचे जबाब, पोस्टमार्टम रिपोर्ट, कूपर हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे जबाब, मुंबई पोलिसांकडून मिळालेली महत्वाची कागदपत्र, दिल्लीतील एम्स ह़ॉस्पिटलच्या फॉरेन्सिक टीमकडून मिळालेला सकारात्मक रिपोर्ट आल्याने सुशांतची हत्या नसून ती आत्महत्याच आहे या गोष्टीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

सुशांतच्या बेडरुमध्ये तीन वेळा क्राईम सीन रिक्रिएट केला गेला. सुशांतचे शेजारी, वॉचमन, या प्रकरणात तपास करणारे मुंबई पोलिस अधिकारी, त्यांनी नोंदवलेले जवळपास ५६ जबाब, पोस्टमार्टम करणारे डॉक्टर यांची कित्येक तास चौकशी करण्यात येत आहे. यात काहीजणांचे जबाब एकमेकांशी जुळत नसले तरी सुशांतच्या आत्महत्येबद्दल ते ठाम आहेत. तसंच एम्सकडे पाठवलेला वैद्यकिय अहवाल आणि कागदपत्रांची पडताळणी करुन अहवाल पाठवला गेला आहे. त्यातही सुशांतने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष नोंदवल्याचं वरिष्ठ अधिका-यांनी स्पष्ट केलं आहे.    

संपादन- दिपाली राणे-म्हात्रे

rbis focus now sushants reasons suicide after hundreds hours investigation it was finally concluded  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com