आमिर खानने शेअर केला व्हिडिओ, 'पाणी फाऊंडेशन'मुळे साता-यातील गावात नापीक जमिनीचं झालं जंगलात रुपांतर

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 30 September 2020

आमिर खानच्या 'पाणी फाऊंडेशन' ने सप्टेंबर २०१८ मध्ये थोर जपानी पर्यावरण शास्त्रज्ञ अकिरा मियावाकीकडून प्रेरणा घेत सायट्रिस पर्यावरण ट्रस्टसोबत हा प्रवास सुरु केला होता ज्याच्या अंतर्गत एका नापीक जमिनीचं जंगलमध्ये रुपांतर होऊ शकलं.

मुंबई- बॉलीवूड अभिनेता आमिर खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आमिर खान त्याच्या 'पाणी फाऊंडेशन' टीमने केलेल्या कामावर आनंद व्यक्त करताना दिसतोय. आमिर खानच्या 'पाणी फाऊंडेशन' ने सप्टेंबर २०१८ मध्ये थोर जपानी पर्यावरण शास्त्रज्ञ अकिरा मियावाकीकडून प्रेरणा घेत सायट्रिस पर्यावरण ट्रस्टसोबत हा प्रवास सुरु केला होता ज्याच्या अंतर्गत एका नापीक जमिनीचं जंगलमध्ये रुपांतर होऊ शकलं. दोन वर्षांनतर सप्टेंबर २०२० मध्ये हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.

हे ही वाचा: सुशांत प्रकरणात नाव घेतल्याने अरबाज खानने यूजर्स विरोधात दाखल केला मानहानीचा दावा  

आमिर खानच्या 'पाणी फाऊंडेशन'ने सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील गावांच्या सहाय्याने २ हजार रोपटी लावली होती. जंगलासारखं बनवण्यासाठी वृक्ष प्रजाती मिसळून काळजीपूर्वक निवडल्या गेल्या आणि वृक्षारोपणावर खास लक्ष दिलं गेलं जेणेकरुन त्यांची वाढ वेगाने होईल. याचा परिणाम जबरदस्त दिसून येतोय आणि अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट आहे की आता तिथे निरोगी झाडे, घनदाट जंगल, प्राण्यांसाठी वस्ती, किडे आणि खूप काही उपलब्ध आहे. 

अभिनेता आमिर खानने हा मनाला भिडणारा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे, 'आमिर खान, किरण राव आणि संपूर्ण पाणी फाऊंडेशनची टीम गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र आणि त्याच्या आसपासच्या जलसंधारण कार्याशी संलग्न आहे. फाऊंडेशनचा अविश्वसनीय वेळ आणि प्रयत्नांमुळे माणसं, झाडं आणि जनावरांना एकसंधरित्या बदलण्यासाठी सक्षम बनवलं आहे. त्यांच्या प्रयत्नांनी नापीक जमीनीमध्ये आज हिरवंगार जंगल तयार झालं आहे.'    

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Please watch and give me your reactions. Love. a.

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

aamir khan paani foundation turns barren land into forest video viral on internet  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aamir khan paani foundation turns barren land into forest video viral on internet