Chhichhore : आमीरनेही केलं 'छिछोरे'चं कौतुक!

टीम ईसकाळ
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

'नितेश तिवारीजी मला छिछोरेचा ट्रेलर खूप आवडला. तुम्हाला या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा! या चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळो आणि आम्हाला या चित्रपटाचा आनंद मिळो. मी हा चित्रपट बघण्यासाठी खूप उत्सुक आहे.' अशी प्रतिक्रिया आमीरने दिली आहे.

आगामी 'छिछोरे' या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. 'दंगल'चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या छिछोरेवर आमीर खानने कौतुकाचा वर्षाव केला आहे. आमीर हा चित्रपट बघण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.

'छिछोरे'चे ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या तसेच ट्रेलरचे कौतुक केले. आमीर खानने ट्विटरवरून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. 'नितेश तिवारीजी मला छिछोरेचा ट्रेलर खूप आवडला. तुम्हाला या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा! या चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळो आणि आम्हाला या चित्रपटाचा आनंद मिळो. मी हा चित्रपट बघण्यासाठी खूप उत्सुक आहे.' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हा चित्रपट कॉलेजमधील मित्रांच्या दोस्तीवर आधारित आहे. छिछोरेमध्य मुख्य भूमिकेत सुशांतसिंह राजपूत आणि श्रद्धा कपूर दिसतील. छिछोरेची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. 30 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aamir Khan praises trailer of hindi movie Chhichhore