Dono Premier: अंदाज अपना अपना! सलमान अन् आमिर जेव्हा समोरासमोर येतात... व्हिडिओ व्हायरल

 salman khan and aamir khan
salman khan and aamir khanEsakal
Updated on

Aamir Khan Salman Khan Video: सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल आणि पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा यांचा 'दोनो' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा आहे.

सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंगकाल पार पडले. भव्य स्क्रिनिंगमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी दिसले होते.

या सर्व सेलिब्रिटींमध्ये लक्ष वेधून घेतलं ते बॉलिवूडचे दोन खान सलमान खान आणि शाहरुख खान यांनी. यावेळी आमिर खान त्याचा मुलगा जुनैदसोबत पोहोचला होता, तर सलमान खानही या कार्यक्रमात दिसला होता.

 salman khan and aamir khan
Mission Raniganj Twitter Review: अशी शौर्यगाथा होणे नाही! अक्षय कुमारच्या सिनेमाने जिंकली मनं

यादरम्यान आमिर आणि सलमान खान यांनी एकमेकांना मिठी मारली. सध्या त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यादरम्यान आमिरने त्याचा मुलगा जुनैद खानची सलमानशी ओळख करून दिली. त्यानंतर या तिघांनीही मीडियासमोर एकत्र पोज दिली.

यामध्ये सलमान खान ब्लॅक पँट आणि शर्टमध्ये खूपच मस्त दिसत आहे, तर आमिर खानचा नवा लूकही पाहायला मिळाला.

 salman khan and aamir khan
Gadar 2 On OTT: गदर 2 OTT वर रिलीज! केव्हा आणि कुठे, पाहता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

सलमान खान आणि आमिर खानला एकत्र पाहून दोघांचे चाहते खुप खूश आहेत. या व्हिडिओला नेटकरी कमेंट करत आहेत. तर दोघांना पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्या मैत्रीचे कौतुक केले तर काहींनी त्यांना 'अंदाज अपना-अपना' ची आठवण करून दिली आहे. अनेकांनी त्याच्याकडे 'अंदाज अपना-अपना' 2 तयार करण्याची विनंती केली आहे.

 salman khan and aamir khan
Rhea Chakraborty On Trolling: सुशांतने आत्महत्या का केली? तीन वर्षांनंतर रियानं केला खुलासा

'दोनो' हा राजश्री प्रॉडक्शन आणि जिओ स्टुडिओ यांचा एकत्रित प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये सूरज बडजात्या क्रिएटिव्ह मेकर आहेत तर चित्रपटाचे संगीत शंकर-एहसान-लॉय यांनी दिले आहे, गीत इर्शाद कामिल यांचे आहेत. यात राजवीर देओल देवच्या भूमिकेत आहे तर पलोमा मेघनाची भूमिका साकारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com