Mission Raniganj Twitter Review: अशी शौर्यगाथा होणे नाही! अक्षय कुमारच्या सिनेमाने जिंकली मनं

अक्षय कुमारचा मिशन राणीगंज सिनेमा आज रिलीज झालाय
akshay kumar mission raniganj twitter review parineeti chopra
akshay kumar mission raniganj twitter review parineeti chopraSAKAL

Mission Raniganj Twitter Review: अक्षय कुमारचा मिशन राणीगंज सिनेमा आज सगळीकडे रिलीज झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. अक्षय कुमारच्या सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे.

अखेर आज मिशन राणीगंज सिनेमा रिलीज झालाय. कसा आहे सिनेमा? काय विशेष आहे? जाणून घ्या.

(akshay kumar mission raniganj twitter review)

akshay kumar mission raniganj twitter review parineeti chopra
Eisha Chopra: नीरजा फेम अभिनेत्री ईशा चोप्राचा विनयभंग; अभिनेत्री म्हणाली, "१० दिवस झाले मी.."

मिशन राणीगंज सिनेमाचा ट्विटर रिव्ह्यू

एकाने ट्विट केलं की, मिशन राणीगंजची एक कथा अशी आहे जी आपल्याला जगण्याच्या अज्ञात शक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देईल... एकंदरीत एक चित्तथरारक क्लायमॅक्ससह जबरदस्त, उत्कृष्ट आणि चित्तथरारक कथानक.. अक्षय कुमार मिशन राणीगंज मध्ये नैसर्गिक आणि सहज अभिनयाने येथे चमकतो..

आणखी एकाने ट्विट केलंय की, #MissionRaniganjReview : मिशन राणीगंज हा अद्भूत आणि उत्कृष्ट सिनेमा आहे. आकर्षक चित्रपट...चित्रपटात आकर्षक पटकथा आणि दमदार संवाद आहेत... अक्षय कुमार कमालीच्या फॉर्ममध्ये आहे.. जसवंत सिंग गिल यांना त्यांच्या शौर्याला सलाम, जरूर पहा..४ तारे - (⭐⭐⭐⭐)

आणखी एकाने ट्विट केलंय की, #MissionRaniganjReview.. आता मध्यंतर झालाय... पूर्वार्ध मनाला भिडणारा आहे... अक्षय कुमारची कामगिरी आणि त्याचा. हा चित्रपट अजिबात मिस करु नका... जा आणि मिशन राणीगंज पहा.

बॉलिवूड हंगामाने रिव्ह्यू केलाय की, #MissionRaniganj Movie Review: चित्रपटाचा विषय, उत्कंठा वाढवणारे क्षण आणि सिनेमा Akshay Kumar च्या अभिनयामुळे प्रभाव पडतो

मिशन राणीगंजची कथा नेमकी काय?

मिशन राणीगंज सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की खाणकामगार जमिनीखाली असलेल्या खोल खाणीत अडकले असतात. अशातच खाणीत पाण्याचा प्रवाहाचा धोका असतो. खाणकामगारांचा जीव धोक्यात असतो.

आणि मग यावेळी अक्षय कुमार पुढे सरसावतो. फक्त ४८ तासात अक्षयला खाली असलेल्या कामगारांना बाहेर काढायचं असतं. मग पुढे काय होतं? हे या थरारक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं.

मिशन राणीगंज आज सगळीकडे रिलीज

अक्षय कुमार, परिणीती चोप्राचा मिशन राणीगंज सिनामाचा थरारक ट्रेलर भेटीला आलाय. हा सिनेमा आज ६ ऑक्टोबरला संपूर्ण भारतात रिलीज झाला आहे.

मिशम राणीगंज सिनेमात अक्षय कुमार,परिणीती चोप्रा, कुमुद मिश्रा असे दिग्गज कलाकार झळकत आहेत. टिनू सुरेश देसाई यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com